आपल्या मृत्यूनंतर अनेकदा आपला वारसाहक्क, पैसे, प्रॉपर्टी यांच काय होणार असा प्रश्न पडतो. मात्र आजकालच्या डिजिटल युगात आपला ऑनलाईन डेटा आपल्या मालमत्तेइतकाच महत्त्वाचा झाला आहे. अनेकजण सोशल मीडिया अकाऊंट्सच्या मदतीने लाखो रुपये कमवतात अशात त्यांच्या मृत्यूंनंतर या अकाउंट्सच काय होणार, कोण हे अकाउंट्स सांभाळणार अशी सर्वच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मृत्यूनंतर आपले सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल डेटाचं काय होत?
अकाऊंट्स अॅक्टिव राहू शकतात: मृत व्यक्तीचे सोशल मीडिया अकाऊंट्स काही काळ अॅक्टिव राहू शकतात, कारण प्लॅटफॉर्मला त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती मिळेपर्यंत ती बंद केली जात नाहीत.
मेमोरियलायझेशन सुविधा: फेसबुकसारख्या काही प्लॅटफॉर्मवर 'मेमोरियल प्रोफाइल'ची सुविधा असते. हे अकाऊंट स्मरण म्हणून ठेवले जातात आणि त्यावर "Remembering" अशी खूण दिसते.
डिजिटल वारसा नियोजन: काही लोक मृत्यूपूर्वी 'डिजिटल वारसा' तयार करून विशिष्ट व्यक्तींना आपले पासवर्ड किंवा डेटा वापरण्याचा अधिकार देतात, ज्यामुळे मृत्यूनंतरही डेटा योग्य प्रकारे हाताळता येतो.
डेटा डिलीट किंवा ट्रान्सफर होतो: अकाऊंट डिएक्टिव्हेट करण्याची किंवा डेटा दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया प्लॅटफॉर्मच्या धोरणांनुसार केली जाऊ शकते, जसं की Google चे "Inactive Account Manager".
कायदेशीर हस्तक्षेप शक्य असतो: काही वेळा कुटुंबीय किंवा कायदेशीर वारसदार कोर्टामार्फत त्या व्यक्तीचा डेटा मिळवण्यासाठी किंवा अकाऊंट हटवण्यासाठी अर्ज करू शकतात. ह्या सर्व प्रक्रिया प्लॅटफॉर्मच्या धोरणांवर आणि मृत व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असतात.