महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने कोकण प्रदेश अविभाज्य भाग आहे. या ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला पर्यटक देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. दरवर्षी कोकणात लाखो पर्यटक येऊन इथे असलेल्या निसर्गाचा, जेवणाचा आस्वाद घेतात. कोकणात समुद्र किनारे, जागृत देवस्थाने, हिरवी झाडी, निसर्गाचे दर्शन, कोकणातील खाद्यसंस्कृती इत्यादी अनेक गोष्टी पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक कोकणात येतात.याच महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या या कोकण प्रांतांचा जन्म कसा झाला माहितेय का ?
कोकण हे नाव कसं पडलं ? 'असा' आहे महाराष्ट्राच्या नंदनवनाचा इतिहास
"येवा कोकण आपलाच आसा" असं चाकरमान्यांचं स्वागत करणारे कोकणकर शहाळ्यासारखे मधुर असतात.
महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात कोकणाचा मोठा वाटा आहे.
अथांग समुद्र, नारळी पोफळीच्या बागा, लाल माती हा निसर्गाचा अविष्कार कोकणात पाहायला मिळतो.
असं म्हणतात की फार पुर्वी कोंकस नावाच्या जमतीचं या ठिकाणी वास्तव्य होतं. त्यावेळी हा प्रदेश कोंकवन म्हणून ओळखला जायचा.
कोंकवन या शब्दाचा अपभ्रंश होत कोकण असं नाव पडलं.
पुराणकथेत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. रोहित खापरे या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याची माहिती देण्यात आली.
पुर्वीच्या काळी भगवान परशुरामाने एक बाण समुद्रात मारला. जिथपर्यंत तो बाण गेला तेवढी जागा समुद्रदेवांना मागे सरकायला सांगितलं.
यावेळी तयार झालेला भुभाग म्हणजे सप्तकोकण.
15 शतकातील काही कागदपत्रांमध्ये या प्रदेशाचा उल्लेख कोकण देशा असा केला आहे.