भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था आहे. लांबच्या प्रवासासाठी हा एक जलद आणि स्वस्त पर्याय आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचे नेटवर्क इतके मोठे आहे की बऱ्याचदा ट्रेन तिच्या ठराविक वेळेत येत नाही ज्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसतो. अनेकदा ट्रेन बराच काळ येत नाही, ज्यामुळे लोकांना आपले प्लॅन्स बदलावे लागतात, नाहीतर रद्द करावे लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? लेट झालेल्या ट्रेनचा तुम्हाला रिफंडदेखील मिळू शकतो. यासाठी रेल्वेने काही नियम तयार केले आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत.
ट्रेन किती तास लेट झाली की मग रिफंड मिळतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार जर तुमची ट्रेन 3 तास किंवा त्याहून जास्त काळ लेट असेल तर तुम्ही तुमचे तिकीट कॅन्सल करुन त्यावर रिफंड मिळवू शकता. यासाठी रेल्वेने काही अटी लागू करण्यात आल्या आहेत
एखाद्या व्यक्तीने तात्काळ तिकीट बुक केले असेल आणि ते कन्फर्म असेल तर अशा परिस्थितीत ट्रेन रद्द झाल्यास तुम्हाला रिफंड दिला जाणार नाही. हा नियम फक्त सामान्य आणि आरक्षित तिकीटांवरच लागू होतो
ट्रेन लेट असल्याकारणाने जर तुम्ही ती रद्द करण्याचा प्रयत्न करत असाल तर रिफंडसाठी तुम्हाला त्यासाठी तिकीट डिपॉजिट रिसिप्ट (TDR) फाइल करणे गरजेचे आहे.
तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरुन अथवा रेल कनेक्ट ॲपवरुन TDR फाइल करु शकता. साधारण 5-7 दिवसांच्या आत बँक खात्यात रिफंडचे पैसे जमा होतात
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचे हे नियम माहिती असणे गरजेचे आहे. परतफेडीसाठी रेल्वेचे हे नियम माहिती असणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते
याद्वारे, तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय परत मिळवू शकता आणि तुमच्या प्रवासाचे नियोजन योग्यरित्या करु शकता