भारतीय उद्योगपती, टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेले आणि त्यांच्या साधेपणा, दूरदृष्टी आणि परोपकारी कार्यांसाठी ते आजही ओळखले जातात. रतन टाटांचे आलिशान घर पाहण्यासारखे होते. मात्र मृत्यूनंतर आता तिथे कोण राहत आहे, याची माहिती कुणालाही नाही. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.
कुठे आहे रतन टाटांचं आलिशान घर? मृत्यूनंतर आता कोण करत आहे इथे निवास
टाटा समूहातून निवृत्त झाल्यानंतर, रतन टाटा हे कुलाबा येथील सी पेसिंग बंगल्यात राहत होते. हे त्यांचे एक आलिशान घर होते, जिथे त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण घालवला. त्यांच्या या घराला "बख्तावर" या नावाने ओळखले जायचे.
रतन टाटा यांचे संपूर्ण घर पांढऱ्या रंगाच्या थीमने डिजाईन केले होते, जे पाहण्यास फार आकर्षत दिसते. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत आणि जर्मन शेफर्ड कुत्र्यासह ते या घरात निवास करत होते.
रतन टाटांच्या या आलिशान घराची किंमत सुमारे १५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. हे घर १३,३५० चौरस फूट पसरलेले आहे. या घरात जिमपासून ते प्रशस्त पार्किंगपर्यंत सर्व साईसुविधा होत्या.
या घराला अनोख्या पद्धतीने डिजाईन करण्यात आले असून घराच्या आत एक हिरवीगार बाग देखील बनवण्यात आली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या या आलिशान घरात कोणीही राहत नाही. सध्या हे घर पूर्णपणे रिकामे आहे.