आपण सर्वांनी आपल्या लहानपणी ओजी पारलेजी बिस्कीट कधी ना कधी खाल्लं असेलच. अनेक नवनवीन बिस्कीट मार्केटमध्ये आली आणि गेले पण पारलेजीची जागा आजवर कुणीही घेऊ शकलं नाही. याच नाव घेताच बिस्कीटाचं पॅकेट आपल्या डोळ्यांसमोर येतं, अशात या पॅकेटवरील मुलीचं नक्की काय झालं किंवा ही मुलगी कोण आहे याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?
भारताचं फेमस बिस्कीट Parle-G च्या पॅकेटवरील ती मुलगी कोण? 65 वर्षांपूर्वीच ते सत्य आलं समोर...
अनेकांना ठाऊक नाही पण हे बिस्कीट सुरुवातील ‘पारले ग्लूको’ या नावाने लाँच करण्यात आलं पण कालांतराने ते ‘पारले-जी’ या नावाने प्रसिद्ध झाले.
१९२९ मध्ये विले पार्लेत स्थापित झालेल्या कंपनीने १९६० च्या दशकात प्रथमच आपल्या पॅकेटवर एका मुलीचे चित्र छापले. हे चित्र पुढे जाऊन पारले-जी बिस्कीटाची ओळख बनलं आणि तेव्हापासूनच या चित्राविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली
पारले-जीच्या पॅकेटवरील या मुलीच्या चित्राबाबत अनेकांनी अनेक दावे करु पाहिले. कुणी म्हटलं ही फोटो कोणत्या सेलिब्रिटिच्या लहानपणीच्या आहे तर कुणी म्हटलं की हा फोटो संस्थापकाच्या मुलीच्या आहे
अशात पारले-जी कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजर मयंक शाह यांनी स्पष्ट केले आहे की, पारले-जी बिस्कीटाच्या पॅकेटवर असणारी मुलगी ही काल्पनिक असून अशी मुलगी खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नाही
अशात पारले-जी कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजर मयंक शाह यांनी स्पष्ट केले आहे की, पारले-जी बिस्कीटाच्या पॅकेटवर असणारी मुलगी ही काल्पनिक असून अशी मुलगी खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नाही