'ब्लॅक बॉक्स' आता सत्य आणणार समोर? अजितदादांच्या विमानात बिघाड होता? कंपनीच्या मालकाची पहिली प्रतिक्रिया, तांत्रिक बिघाडामुळे...
Ajit Pawar Plane Crash News in Marathi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. पवार हे दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सच्या मालकीच्या लिअरजेट ४५ एक्सआर विमानात होते. अडीच वर्षांपूर्वी, त्याच कंपनीचे लिअरजेट ४५ एक्सआर विमान कोसळले. आज कोसळलेल्या विमानाचा नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके होता. मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर सकाळी ८:४८ वाजता बारामती हवाई पट्टीजवळ लँडिंग करतानाचा विमानात अपघात झाला. ज्या विमान कंपनीला अपघात झाला त्या कंपनीवर गंभीर आरोप होऊ लागले. किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यात आता विमान कंपनीच्या मालकांनी अपघातावर भाष्य केले आहे.
अपघातानंतर जेटला आग लागली आणि अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला. व्हीएसआर व्हेंचर्सशी संबंधित अशीच एक घटना यापूर्वी १४ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती. त्यावेळी, कंपनीचे दुसरे लिअरजेट ४५ एक्सआर विमान, ज्याचा नोंदणी क्रमांक व्हीटी-डीबीएल होता, मुंबई विमानतळावर कोसळले. विमान विशाखापट्टणमहून नॉन-शेड्यूल केलेले प्रवासी उड्डाण करत होते. लँडिंग दरम्यान मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता ही समस्या होती.
दुर्दैवी विमान अपघातानंतर सरकारी आणि नागरी वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित विमान ज्या कंपनीचे आहे, म्हणजेच ‘व्हीएसआर एव्हिएशन’ ही कंपनी मालक आहे. सिंग यांनी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या संशय व्यक्त केला आहे.
विमानात खरचं बिघाड होता का? यावर भाष्य करताना व्ही.के. सिंह यांनी सांगितले की, आमच्या माहितीनुसार आणि रेकॉर्डनुसार हे विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही.
अपघाताच्या कारणाबद्दल बोलताना त्यांनी हवामानाकडे बोट दाखवले. “प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी परिसरात दृश्यमानता अत्यंत कमी होती. धुक्यामुळे किंवा खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नसावा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) चौकशीनंतरच स्पष्ट होईल,” असे सिंह यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लँडिंग दरम्यान जेट धावपट्टी २७ वरून वळले. ऑटोपायलट बंद केल्यानंतर लगेचच, कॉकपिटमध्ये स्टॉल अलर्ट आणि टेरेन अलर्ट रेकॉर्ड करण्यात आला. त्यानंतर विमान टॅक्सीवे चौकाजवळ क्रॅश-लँडिंग झाले. फ्यूजलेजचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग लागली. तथापि, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि कोणीही मारले गेले नाही. बारामतीमध्ये बुधवारी झालेल्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.






