कोणत्याही व्यक्तीची हत्या केल्यानंतर किंवा कोणताही गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराला जेल मध्ये टाकले जाते. त्यानंतर कायद्यानुसार गुन्हेगाराला अनेक कठोर शिक्षा सुद्धा दिल्या जातात. जेलमध्ये गेल्यानंतर कैद्यांना वेगवेगळी कामे करण्यास सुद्धा दिली जातात. तसेच तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल तुरुंगातील कैद्यांना मिळणारे अन्न अनेकदा बेचव किंवा निकृष्ट दर्जाचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुरूंगामधील कैद्यांना बेचव अन्नपदार्थ खाण्यास का दिले जाते? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
तुरूंगामधील कैद्यांना बेचव अन्नपदार्थ खाण्यास का दिले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

भारतामध्ये कैद्यांच्या जेवणासाठी सरासरी 52.42 खर्च केले जातो. तसेच महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये हा खर्च खूप जास्त कमी आहे. त्यामुळे एवढ्या कमी पैशांमध्ये कैद्यांना जेवण देणे कठीण आहे.

तुरुंगातील हजारो कैद्यांसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जेवण बनवले जाते. मोठ्या मोठ्या भांड्यात शिजवलेल्या अननपदार्थांची चव फारशी पहिली जाते. जेवण बनवताना पदार्थाच्या चवीकडे खूप जास्त दुर्लक्ष केले जाते.

तुरुंग प्रशासनानुसार, कैदीना चैनीचे पदार्थ देणे नसून केवळ जगण्यासाठी आवश्यक पोषण पुरवणे आहे. त्यामुळे तुरुंगात जेवण बनवताना अतिशय कमी प्रमाणात तेल आणि मसाल्यांचा वापर केला जातो.

अन्नपुरवठा करताना कंत्राटे कामे कमीत कमी बोली लावणाऱ्या लोकांना दिली जातात. नफा मिळवण्यासाठी ठेकेदार निकृष्ट दर्जाचे धान्य किंवा भाज्यांचा वापर जेवण बनवतना करतात.

विविध आजार असलेले कैदी आणि विविध धर्मांच्या श्रद्धा जपण्यासाठी कैदीना अतिशय साधा आहार दिला जातो. हा आहार सगळ्यांसाठी सुरक्षित असतो पण पदार्थाना अजिबात चव नसते.






