श्रावण महिन्याला ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. तसेच हा महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो.श्रावण महिन्यात अनेक सण असतात. त्याशिवाय श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. तसेच अनेक महिला श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घालण्यास जास्त प्राधान्य देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे आणि बांगड्या का परिधान केल्या जातात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pintrest)
श्रावण महिन्यात महिला हिरवे कपडे आणि बांगड्या का घालतात?
श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. पावसाळ्यात सर्वत्र पसरलेली हिरवळ निसर्ग, नवीन जीवन आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच सर्व स्त्रिया श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे घालतात.
देवी पार्वतीला हिरवा रंग आवडतो. या महिन्यात भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. प्रत्येक सोमवारी महिला हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या घालून देवी पार्वतीची पूजा केली जाते.
हिरवा रंग शुभ, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हिरव्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या परिधान केल्यास वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते आणि मनाला शांती मिळते.
हिरव्या रंगला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्वासोबतच वैज्ञानिक म्हत्वसुद्धा आहे.शरीरात वाढलेले तणाव कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
यंदाच्या श्रावण महिन्यात तुम्हीसुद्धा हिरव्या रंगाचे कपडे आणि बांगड्या परिधान करून भगवान शंकराची मनोभावे पूजा करून इच्छित फळ मिळवू शकता.