T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम (Photo Credit- X)
आयसीसीने (ICC) अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, विविध अहवालांनुसार यंदाची एकूण बक्षीस रक्कम $१३.५ दशलक्ष (सुमारे १२०.३७ कोटी रुपये) असण्याचा अंदाज आहे. २०२४ च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदा बक्षीस रकमेत २०% वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम केवळ अंतिम फेरीतील संघांनाच नाही, तर सहभागी होणाऱ्या सर्व २० संघांना त्यांच्या कामगिरीनुसार वाटली जाणार आहे.
| स्थान / कामगिरी | पुरस्कार रक्कम (भारतीय रुपये) |
| विजेता संघ (Champion) | सुमारे २७.४८ कोटी रुपये |
| उपविजेता संघ (Runner-up) | सुमारे १४.६५ कोटी रुपये |
| उपांत्य फेरीतील पराभूत संघ (प्रत्येक) | सुमारे ७.२४ कोटी रुपये |
| ५ व्या स्थानावरील संघ (प्रत्येक) | सुमारे ३.४८ कोटी रुपये |
| १३ व्या स्थानावरील संघ (प्रत्येक) | सुमारे २.२९ कोटी रुपये |
IND U19 vs AFG U19,U19 WC 2026 : भारताच्या अडचणी वाढल्या! हरारेमध्ये फैसल शिनोजादाचा शतकी तडाखा
२०२६ चा टी-२० विश्वचषक अधिक भव्य करण्यासाठी आयसीसीने विशेष प्रयत्न केले आहेत. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा ८ मार्च २०२६ रोजी अंतिम सामन्याने संपेल. पूर्ण स्पर्धेत एकूण ५५ सामने खेळले जातील. विशेष म्हणजे, भारतीय संघ (Team India) या स्पर्धेत ‘गतविजेता’ म्हणून मैदानात उतरणार असल्याने जगभरातील चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर खिळल्या आहेत.
२० संघ सहभागी होत असल्याने अफगाणिस्तान, अमेरिका आणि आयर्लंड सारखे संघ मोठ्या देशांना धक्का देण्यासाठी सज्ज आहेत. मैदानातील ट्रॉफीच्या लढाईसोबतच या ‘छप्परफाड’ बक्षीस रकमेमुळे खेळाडूंमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.






