सध्या सगळीकडे प्रचंड ऊन दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशाच्याही पलीकडे गेले आहे. अशावेळी डिहायड्रेशन, उष्माघात असे अनेक आजार उद्भवतात आणि अनेक जणांना उन्हाचा तडाखा बसून त्रास होतो. अशावेळी सोपा उपाय म्हणजे तुम्ही नियमित पाण्यात मीठ आणि साखर मिक्स करून प्यावे. आता याचा नक्की शरीराला काय फायदा होतो असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर याचे उत्तर या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. सध्याच्या या रणरणत्या उन्हात तुम्ही नक्की याचा वापर करून घ्यावा (फोटो सौजन्य - Pixabay, Pixel)
तीव्र उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे शरीराला भरपूर घाम येतो. घामामुळे शरीरातील पाणी तर बाहेर पडतेच, पण क्षारदेखील बाहेर पडतात. हा उपाय शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास आणि निर्जलीकरण टाळण्यास मदत करतो

आपल्या शरीरातील पेशी आणि नसा यांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता असते

या द्रावणातील सोडियम शरीरातील द्रव टिकवून ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते

कडक उन्हात आपल्याला अनेकदा अशक्तपणा आणि सुस्ती जाणवते. साखर रक्तात मिसळल्यावर शरीराला त्वरित ऊर्जा देते, थकवा कमी करते आणि चक्कर येणे टाळते

जेव्हा शरीराचे तापमान वाढते आणि निर्जलीकरण होते, तेव्हा उष्माघाताचा धोका वाढतो. हे द्रावण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते

अत्यधिक उष्णतेमुळे अनेकदा रक्तदाब कमी होऊन चक्कर येऊन व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. या द्रावणातील मीठ रक्ताचे प्रमाण वाढवून सामान्य रक्तदाब राखण्यास मदत करते.






