World Highest Rail Bridge: ढगांतून केलेला प्रवास हा स्वर्गसुखाहून काही कमी नाही. हा असा प्रवास सहसा आपल्याला विमानातून करता येतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा अद्भुत अनुभव तुम्हाला भारताच्या रेल्वे प्रवासातूनही करता येऊ शकतो. जगातील सर्वात उंच रेल्वे जो भारतात आहे, तो आता प्रवासासाठी सज्ज झाला आहे. हिमालय आणि बर्फाच्छादित पर्वतांमधून जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर पहिल्यांदाच ट्रेन धावणार आहे. यामुळे आता संपूर्ण देश काश्मीरशी जोडला जाणार आहे.
अद्भुत प्रवास! भारतात आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, ढगांच्या मधून जणू स्वर्गातूनच होतो प्रवास
मागील शनिवारी कटरा बनिहाल रेल्वे विभागात प्रथमच ट्रेनची यशस्वी टेस्टिंग पूर्ण करण्यात आली. यातून आता दिल्ली ते श्रीनगर म्हणजेच काश्मीरपर्यंत रेल्वेने प्रवास करता येणार आहे
आम्ही तुम्हाला सांगतो की, काश्मीरला जोडणारा चिनाब पूल हा पॅरिसच्या आयफेल टॉवरहुन अधिक उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर चिनाब पुलाची उंची 359 मीटर आहे
या पुलावरून गाड्या गेल्यावर ढगांमधून जात असल्याचा भास होतो. हे संपूर्ण दृश्य स्वर्गाहून काही कमी वाटत नाही. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत या पुलाला बांधण्यात आले आहे
जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याचे काम करेल. मुख्य म्हणजे, हा पूल बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागली. रेल्वेने 2003 मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली होती आणि 2025 मध्ये तो पूर्णपणे प्रवासासाठी सज्ज झाला आहे
हा पूल पुढील 120 वर्षांसाठी सज्ज करण्यात आला आहे. हा पूल ताशी 220 किमी वेगाने जाणाऱ्या वादळालाही तोंड देण्यास सक्षम आहे. शक्तिशाली बॉम्बस्फोटही या पुलाचे नुकसान करू शकणार नाही असा दावा करण्यात आला आहे
हा पूल बांधण्यासाठी सरकारला एकूण 14,000 कोटी रुपये खर्च आला आहे. दरम्यान या रेल्वेचा आता काश्मीर जनतेला मोठा फायदा होणार आहे. काश्मीरमधील लोक रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या इतर भागांशी संपर्क साधू शकतील