जम्मू आणि काश्मीरची सुरुवात खराब झाला. डोग्रा आणि कन्हैया वाधवान क्रीजवर होते आणि त्यांनी संघाला स्थिर स्थितीत नेउन ठेवलं. त्याआधी शुभम पुंडिर आणि अब्दुल समद बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. दरम्यान, डोग्राने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा बॉल बाउंड्रीपार केला. चाबूक शॉर्ट मारल्यानंतर लगेच अनिशसोबत वाद सुरु झाला. जो सिली-पॉईंटवर पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून तैनात होता.
वाद वाढत गेला आणि डोग्राने अनिशला डोक्यात मारले. डोग्राने पुढे होऊन हेल्मेट घातले असूनही अनिशला डोक्यात मारले. मैदानावरील खेळाडू आणि पंचांनी लगेचच यात हस्तक्षेप करत दोघांनाही बाजूला केलं. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली आणि सामना पुन्हा सुरू झाला. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
pic.twitter.com/DxoQQesQ2R — Nihari Korma (@NihariVsKorma) February 25, 2026
४८ चेंडूत ९ धावा काढल्यानंतर डोग्रा रिटायर हर्ट झाला. दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर त्याने संयमी फलंदाजी सुरु ठेवली आणि ७० धावा काढल्या. श्रेयस गोपाळने त्याला बाद केलं. भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वसीम जाफर अव्वल स्थानावर आहे, त्याने १९९७ ते २०२० दरम्यान १४,६०९ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर चेतेश्वर पुजारा आहे, ज्याच्याकडे १३,६०३ धावा आहेत आणि सरासरीने (५७.८८) तो आघाडीवर आहे. पारस डोगरा १०,५४६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, जम्मू आणि काश्मीरने १५६ षटकांत ६ बाद ५२७ धावा केल्या. साहिल लोत्रा ५७ धावांसह आणि आबिद मुश्ताक २० धावांसह खेळत होते.






