ट्रेनने प्रवास करणं मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका रेल्वे प्रवासाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात धोकादायक रेल्वे प्रवास मानला जात आहे. या ट्रेनमध्ये ना बसण्यासाठी सीट आहे आणि ना पिण्यासाठी पाणी आहे. जगातील या सर्वात धोकादायक रेल्वे प्रवासात 18 ते 20 तासांचा वेळ लागतो. ही ट्रेन न थांबता 704 किमी धावते. (फोटो सौजन्य – Pinterest)
जगातील सर्वात भयानक रेल्वे यात्रा! ना बसण्यासाठी सीट, ना पिण्यासाठी पाणी; न थांबता धावते तब्बल 704 किमी
आता आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वेप्रवासाबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये ना बसण्यासाठी सीट आहे आणि ना पिण्यासाठी पाणी. एवढचं काय तर या रेल्वेमध्ये छत देखील नाही.
50 डिग्रीचं तापमान सहन करून बिना छत असलेल्या या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोकांची गर्दी असते. ही ट्रेन अफ्रीकी देश मॉरीतानियामध्ये धावते, ज्याला ट्रेन टू डेसर्ट (Train Du Desert) नावाने ओळखलं जातं.
सहारा वाळवंटातून जाणारी ही ट्रेन 20 तासांत 704 किलोमीटरचे अंतर कापते. या ट्रेनला तब्बल 200 डब्बे आहे आणि 3 ते 4 इंजिन जोडलेले असतात.
खरं तर ही ट्रेन एक मालगाडी आहे. ज्यामध्ये एक एक डब्बा पॅसेंजर्ससाठी असतो. या प्रवासासाठी त्यांना पैसेही खर्च करावे लागत नाहीत. मोफत प्रवास करण्याच्या लोभापायी लोक खुल्या मालगाड्यांमध्ये प्रवास करतात.
मॉरिटानियाची राजधानी नौआकचॉटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन प्रवासाचे एकमेव साधन आहे.
पश्चिम आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून लोहखनिज वाहतूक करण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती.