इराणमध्ये जनतेचा संताप शिगेला; ९२% नागरिक नाराज, सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इराणमध्ये प्रचंड असंतोष: राष्ट्रपती कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार तब्बल ९२% नागरिक सरकारबद्दल नाराज असून ही असमाधानाची ऐतिहासिक पातळी आहे.
महागाई–बेरोजगारीचा कहर: इराणी रियालचे ५९% अवमूल्यन, महागाई ४०% पेक्षा जास्त, आणि ४०% जनता दारिद्र्यरेषेखाली गेल्याने आर्थिक संकट तीव्र.
राजकीय विश्वास ढासळला: संसद आणि प्रांतीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल जनतेची नाराजी वाढली असून सरकारवरील विश्वासाचा पाया हादरला आहे.
Iran Survey 2025 : इराणमध्ये ( Iran) जनतेचा रोष अभूतपूर्व स्तरावर पोहोचला आहे. राष्ट्रपती कार्यालयाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे देशातील तब्बल ९२ टक्के नागरिक सरकारच्या कामकाजावर नाराज आहेत. महागाई, बेरोजगारी, तेल निर्यातीत घट, निर्बंध आणि मूलभूत सेवा व्यवस्थेतील ढासळलेली गुणवत्ता यामुळे जनतेचा संताप उफाळून आला आहे. हे सर्वेक्षण राष्ट्रपती मसूद पजेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी केलेल्या १६ प्रांतांच्या दौऱ्यादरम्यान पार पडले. या दौर्यात स्थानिक अधिकाऱ्यांची कामगिरी, जनतेच्या समस्या आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. परंतु सर्वेक्षणाचे निष्कर्ष सरकारसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.
राष्ट्रपती कार्यालयाने घेतलेल्या या सर्वेक्षणात एक महत्त्वाची बाब समोर आली
५९% नागरिकांनी संसद सदस्यांच्या कामगिरीला पूर्णपणे निराशाजनक असे म्हटले आहे.
प्रांतीय अधिकाऱ्यांना बहुसंख्य नागरिकांनी ‘कमकुवत’ किंवा ‘सरासरी’ रेटिंग दिले आहे.
यातून स्पष्ट होते की समस्या केवळ केंद्र सरकारपुरती मर्यादित नाही, तर शासकीय यंत्रणेच्या विविध स्तरांवर जनतेचा विश्वास ढासळला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
इराणची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून निर्बंधांच्या ओझ्याखाली दबली आहे. तेल निर्यातीत घट, परकीय चलनाचा तुटवडा, आणि जागतिक बाजारातील दबाव यामुळे आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे.
इराणी रियालने ५९% मूल्य गमावले, जे नागरिकांच्या क्रयशक्तीवर प्रचंड परिणाम करणारे ठरले.
अधिकृत आकड्यांनुसार महागाई ४०% पेक्षा अधिक झाली असून काही तज्ञांच्या मते प्रत्यक्ष महागाई याहूनही जास्त आहे.
इंधन, अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक सेवांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
१२% पेक्षा जास्त बेरोजगारी, विशेषतः सीमावर्ती भागात, तरुणांना अधिक असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलत आहे.
अर्थतज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे जर तातडीने मूलभूत आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी केली नाही, तर सामाजिक असंतोषाचे वादळ आणखी प्रखर होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Political Twist: शेख हसीनाचे ‘हे’ चार धडाकेबाज यू-टर्न; 2026 निवडणुकांपूर्वी ढाक्यात राजकीय भूकंप
गेल्या एका वर्षात दारिद्र्यरेषेमध्ये तब्बल ३०% वाढ झाली आहे.आज इराणमधील सुमारे ४०% जनता दारिद्र्यरेषेखाली जीवन व्यतीत करत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांचे दैनंदिन जीवन अधिक कठीण झाले आहे. अन्नधान्य मिळवण्यासाठी संघर्ष, आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष आणि शिक्षणातील असमानता वाढत चालली आहे.
अलिकडील इस्रायल–इराण युद्धाच्या १२ दिवसांनी इराणची आर्थिक पाठ अधिकच मोडली. या युद्धामुळे
अब्जावधी डॉलरचे नुकसान,
पायाभूत सुविधांचे तुकडे,
आणि अमेरिका–इराण संबंधातील तणाव वाढला.
या परिस्थितीने चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटींवरही सावट पडले आहे. आर्थिक संकट, बाह्य तणाव आणि देशांतर्गत अस्थिरता यांचा प्रभाव आता सरकारच्या स्थिरतेवर होऊ लागला आहे.
जनतेचा ९२% नाराजी दर केवळ एक आकडा नाही, तर इराणमधील लोकशाहीची वेदनादायी वास्तविकता आहे. सक्रिय आणि लोकाभिमुख सरकार असूनही, नागरिक सरकारपासून दुरावले आहेत.
राष्ट्रपती मसूद पजेश्कियान यांच्या सरकारसमोर आता दोन मोठी आव्हाने उभी आहेत
अर्थव्यवस्थेला स्थिर करणे
जनतेचा ढासळलेला विश्वास पुन्हा मिळवणे
या दोन्ही गोष्टी साध्य करणे अवघड असले तरी आगामी काळात सरकारची खरी परीक्षा याच पातळीवर होणार आहे.






