Zee Marathi Awards 2026: ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मध्ये विविध मालिकांमधील सात आई एकत्र येऊन खास सरप्राईज परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या परफॉर्मन्समध्ये सहभागी झालेल्या मेघना एरंडे जोशी यांनी रिहर्सल, पारंपरिक नऊवारी साडीतील तयारी आणि बॅकस्टेजच्या धमाल किस्स्यांबद्दल सांगितले.
zee marathi awards 2026 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

मालिकांमधील आईंचा एकत्रित धमाकेदार सरप्राईज परफॉर्मन्सयंदाच्या Zee Marathi Awards 2026 सोहळ्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे झी मराठीवरील गाजत असलेल्या मालिकांमधील सर्व लोकप्रिय आया एकाच मंचावर एकत्र येऊन एक जबरदस्त सरप्राईज डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

या स्पेशल अॅक्टमध्ये 'सनई चौघडे' मधील पमा आणि तेजस्विनी, 'लक्ष्मी निवास' मधील लक्ष्मी, 'तारिणी' मधील कौशिकी, 'दीपज्योती' मधील सुलोचना, 'वीण दोघातली ही तुटेना' मधील मंदाकिनी आणि 'कृष्णाईच्या लेकी' मधील सत्यभामा अशा सात लोकप्रिय अभिनेत्रींचा समावेश आहे.

मेघना एरंडे जोशी यांनी सांगितलं की, हा परफॉर्मन्स फक्त दोन-तीन मिनिटांचा होता, आम्ही स्टुडिओमध्ये एकदाच एकत्र रिहर्सल केली आणि नंतर आपापल्या सेटवर सराव करून थेट टेक्निकल रिहर्सलला भेटलो, तरीही आमचा परफॉर्मन्स इतका सुंदर झाला की प्रेक्षकांनी आम्हाला वन्स मोअर दिला.

मेघना एरंडे जोशी यांनी सांगितलं की, हा परफॉर्मन्स फक्त दोन-तीन मिनिटांचा होता, आम्ही स्टुडिओमध्ये एकदाच एकत्र रिहर्सल केली आणि नंतर आपापल्या सेटवर सराव करून थेट टेक्निकल रिहर्सलला भेटलो, तरीही आमचा परफॉर्मन्स इतका सुंदर झाला की प्रेक्षकांनी आम्हाला वन्स मोअर दिला.

या परफॉर्मन्ससाठी सगळ्यांनी पारंपरिक नऊवारी लूक केला होता, ज्यामध्ये साडीला अंगावरच टाके घातल्यामुळे चार-पाच तास साडी काढताच येत नव्हती, त्यात दागिने सांभाळत डान्स करणं खूप कठीण होतं, पण स्टेजवर पडलेल्या फुटलेल्या बांगड्यांच्या काचा पाहून मेघना यांनी 'द मॅट्रिक्स' सिनेमातील हिरोसारख्या वेगाने त्या काचा उचलून बाजूला केल्या आणि मोठी दुखापत टाळली.

जर तुम्हाला या सर्व आईंचा हा धमाल परफॉर्मन्स आणि झी मराठी अवॉर्ड्सचा हा अविस्मरणीय सोहळा पाहायचा असेल, तर 31 ऑक्टोबर शनिवार आणि 1 नोव्हेंबर रविवार संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर पाहायला अजिबात विसरू नका.






