असदुद्दीन ओवैसी यांना गृहमंत्रालयाकडून सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दहशदवादी हल्ल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाला डावलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.24) नवी दिल्ली इथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 06 वाजता ही बैठक संसद भवनात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीत माहिती देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात सरकारने योजलेल्या उपायांबद्दल ते सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देणार आहेत. मात्र या बैठकीला असदुद्दीन ओवैसी यांना न बोलावल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन रोष व्यक्त केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडिया पोस्टमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी लिहिले आहे की, “पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीबाबत मी काल रात्री किरेन रिजीजू यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की ते फक्त “05 किंवा 10 खासदार” असलेल्या पक्षांनाच आमंत्रित करण्याचा विचार करत आहेत. जेव्हा मी विचारले की कमी खासदार असलेल्या पक्षांना का नाही, तेव्हा त्यांनी सांगितले की बैठक “खूप लांब” होईल. जेव्हा मी विचारले की “आमचे काय, लहान पक्ष?” तेव्हा त्यांनी विनोद केला की माझा आवाज तरीही खूप मोठा आहे. ही भाजपची किंवा इतर पक्षाची अंतर्गत बैठक नाही, ती दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरुद्ध एक मजबूत आणि एकत्रित संदेश देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आहे”
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पक्षांच्या चिंता ऐकण्यासाठी एक अतिरिक्त तास घालवू शकत नाही का? तुमच्या स्वतःच्या पक्षाकडे बहुमत नाही. १ खासदार असलेला पक्ष असो किंवा १०० खासदार, ते दोघेही भारतीयांनी निवडून दिले आहेत आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचे म्हणणे ऐकण्यास पात्र आहेत. हा राजकीय मुद्दा नाही, तो एक राष्ट्रीय मुद्दा आहे. सर्वांना ऐकले पाहिजे. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की ही खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय बैठक व्हावी, संसदेत खासदार असलेल्या प्रत्येक पक्षाला आमंत्रित केले पाहिजे,” अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला होता.
Regarding the Pahalgam All Party Meeting, I spoke to @KirenRijiju last night. He said they’re thinking of inviting only parties with “5 or 10 MPs.” When I asked why not parties with fewer MPs, he said that the meeting would get “too long.” When I asked “What about us, the smaller…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 24, 2025
मात्र त्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांना गृहमंत्र्याकडून सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, गृहमंत्र्याकडून त्यांना आता फोन आला होता. यावेळी त्यांना गृहमंत्री अमित शाह यांनी विचारले की कुठे आहात? तर हैदराबादमध्ये असल्याचे सांगितले. सायंकाळी सर्वपक्षीय बैठक आहे तर लवकर यावे, अन्यथा उशीर होईल, असे गृहमंत्री म्हणाले. यावर लवकरात लवकर जे विमान उपलब्ध होईल त्याने दिल्लीमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करेन, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे.
#WATCH | | Hyderabad, Telangana: On the all-party meeting called over #PahalgamTerroristAttack, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, “The reason for which the all-party meeting is called is of national importance. The Home Minister just called me and asked where I am. He has asked… pic.twitter.com/MnKF9TjiEe
— ANI (@ANI) April 24, 2025