मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चामध्ये शरद पवार सामील होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली. पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दहशदवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सहा जण महाराष्ट्रामधील आहेत. दरम्यान, पुण्यातील दोन जीवलग मित्र असलेल्या संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांची राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे.
पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज (दि.24) पहाटे शहरामध्ये आणण्यात आले. यावेळी पुणे विमानतळावर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जगदाळे आणि गणबोटे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर जेष्ठ नेते व राज्यसभा खासदार शरद पवार हे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नींशी संवाद साधून तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दहशदवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीसोबत खासदार शरद पवार यांनी संवाद साधून घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, कौस्तुभ गणबोटेंचा मित्र कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. अजान पढता है क्या विचारलं? आम्ही हे ऐकल्यावर पटापटा टिकल्या काढून फेकल्या आणि अल्ला हो अकबर म्हणायला लागलो. जोरजोरात अल्लाचं नाव घेतले तेव्हा तो निघून गेला पण दोघांना (कौस्तुभगणबोटे आणि संतोष जगदाळे) यांना मारुन टाकलं. आणखी एकजण मागे बसला होता त्यालाही मारले” असा घटनाक्रम कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांना सांगितले.
शरद पवार यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. शऱद पवार यांनी लिहिले आहे की, कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अंत झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप देसले यांच्यासह अनेक निष्पाप भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अंत झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 24, 2025
देशभरातील निष्पाप पर्यटक अशा भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत, ही बाब अंतःकरणाला चटका लावणारी आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे, आजच्या काळाची गरज आहे, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.