Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप

सभापती निवडीसाठी कोणत्या गटाचा 'व्हीप' लागू होणार, यावरून दोन्ही बाजूंनी दावा-प्रतिदावा केला जात आहे. दानवे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे,

  • By anuradha sagar
Updated On: Apr 04, 2026 | 12:46 PM
Sambhaji Nagar, Ambadas Danve, Shiv Sena, ZP Election, Maharashtra Politics,

Sambhaji Nagar, Ambadas Danve, Shiv Sena, ZP Election, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:

 

ZP Election Sambhaji Nagar 2026 : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. आगामी सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वीच ‘व्हीप’ बजावण्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे आणि आमदार रमेश डोंगावकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्ण डोंगावकर यांनी थेट अंबादास दावने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला फायदा व्हावा यासाठी व्हीप जारी केल्याचा आरोप केला आहे. पण अंबादास दानवे यांनी मात्रे डोंगावकरांचे हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. “हा व्हीप पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला होता.

कृष्ण डोंगावकर म्हणाले की, त्यांना सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. मात्र, निवडणुकीला काही तास शिल्लक असताना, पक्षाने अचानक व्हीप जारी करून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे निर्देश दिले.

बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापणार; महाविकास आघाडीत फूट पडणार? आता अंतिम निर्णय

शिस्त राखण्यासाठी व्हीप जारी

अंबादास दानवे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार घेण्यात आला होता आणि त्यांनी केवळ त्या आदेशाचे पालन केले होते. जर व्हीप जारी केला नसता, तर दुसऱ्या राजकीय पक्षाला फायदा झाला असता, त्यामुळे हा निर्णय पक्षाच्या सर्वोत्तम हितासाठी घेण्यात आला. तसेच, कृष्णा डोंगावकर यांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे, पक्षाची शिस्त राखण्यासाठी व्हीप जारी करणे आवश्यक होते, असही दानवेंनी स्पष्ट केलं.

सभापती निवडीसाठी कोणत्या गटाचा ‘व्हीप’ लागू होणार, यावरून दोन्ही बाजूंनी दावा-प्रतिदावा केला जात आहे. दानवे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे, तर डोंगावकरांनी हा दबावतंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे. सत्तेच्या समीकरणासाठी फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Ambadas danve vs dongavkar the battle for zp president post turns ugly with shocking allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Zilla Parishad Election

संबंधित बातम्या

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
3

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
4

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.