Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray : ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, तेच काम उत्तम करत आहेत,’ अमित ठाकरे यांची जहरी टीका

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्या मुलाच्या शाळेच्या प्रवेशावरून साटम यांनी केलेल्या वक्तव्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Aug 27, 2026 | 03:10 PM
अमित ठाकरे यांची अमित साटम यांच्यावर जहरी टीका

अमित ठाकरे यांची अमित साटम यांच्यावर जहरी टीका

Follow Us
Follow Us:
  • अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्यावर बोचरी टीका केली.
  • मुलाच्या शाळेच्या प्रवेशावरून केलेल्या वक्तव्याला अमित ठाकरेंचे प्रत्युत्तर.
  • पेपरफुटी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारवर निशाणा.
 

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. पाचपावली परिसरातील सिंधू महाविद्यालयाला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेची पाहणी केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय आणि विद्यार्थी प्रश्नांवर भाष्य केले.

यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेसंदर्भातील भूमिकेवर केलेल्या टीकेबाबत अमित ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे यांनी आपल्या नातवाला बालमोहन विद्यालयात प्रवेश द्यावा आणि त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर बोलावे, असे आव्हान साटम यांनी दिले होते.

‘माझा मुलगा कुठल्या शाळेत जायचा हे ते ठरवणार का?’

अमित साटम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत ‘लेटर वॉर’चा भडका; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ताटकळत ठेवल्याने राजकारण तापलं

पुढे त्यांनी साटम यांच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला. लोकांच्या मृत्यूवर हसल्याचा आरोप करत, “तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला पाहिजे?” असा सवाल अमित ठाकरे यांनी केला.

मनसेची विद्यार्थी सभासद नोंदणी

अमित ठाकरे यांनी नागपुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेची माहिती घेतली. मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकनंतर नागपुरातही विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी आपण दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण संवाद साधत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी केवळ सेल्फी घेण्याऐवजी आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

महाविद्यालयातील स्वच्छतागृहाच्या परिस्थितीचाही त्यांनी उल्लेख केला. विद्यार्थिनी आपल्या समस्या मोकळेपणाने सांगत नसल्याची खंत व्यक्त करत, विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडल्यास संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sushma Andhare News:   जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक

आदिवासी विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर सरकारला घेरलं

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही अमित ठाकरे यांनी भाष्य केले. सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रलंबित निधी आणि संबंधित निर्णयांचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय पेपरफुटीच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस काम कधी सुरू होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुण पिढी अत्यंत जागरूक असून त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, असेही अमित ठाकरे म्हणाले.

नागपूर दौऱ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात मनसे विद्यार्थी सेनेची संघटनात्मक बांधणी अधिक आक्रमकपणे करण्याचे संकेत त्यांच्या दौऱ्यातून मिळाले आहेत.

Web Title: Amit thackeray amit satam criticism nagpur mns student membership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • amit satam
  • amit thackeray
  • MNS

संबंधित बातम्या

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू
1

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू

Mumbai SIR Protest : अब होगा तांडव! शिवाजी पार्कवर उद्यापासून पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी जाहीर केली पुढची भूमिका
2

Mumbai SIR Protest : अब होगा तांडव! शिवाजी पार्कवर उद्यापासून पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी जाहीर केली पुढची भूमिका

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
3

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.