Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News : “महायुतीत कोणताही वाद नाही”, आनंद परांजपे यांच्या प्रवेशावर उदय सामंतांची भूमिका स्पष्ट

Uday Samant on Anand Paranjpe : आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशामुळे महायुतीत कोणता वाद नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 11:39 AM
"महायुतीत कोणताही वाद नाही", आनंद परांजपे यांच्या प्रवेशावर उदय सामंतांची भूमिका स्पष्ट

"महायुतीत कोणताही वाद नाही", आनंद परांजपे यांच्या प्रवेशावर उदय सामंतांची भूमिका स्पष्ट

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच परांजपे यांचा पक्ष प्रवेश
  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाच्या बातम्या निराधार
  • शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर झाला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी आज केले. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, महायुतीत मित्र पक्षांनी युती धर्माचे पालन करावे, असे सामंजस्याने ठरले आहे. मात्र एखादा पदाधिकारी स्वत:हून पक्ष सोडणार असेल तर त्याने महायुतीतच राहावे ही आमची जबाबदारी आहे. परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते. मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत परांजपे यांनी तो निर्णय घेतला, असे मंत्री सामंत म्हणाले.

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले

तसेच परांजपे यांचा डीएनए शिवसेनेचाच असल्याने ते स्वगृही परतले. परांजपे यांनी पक्ष प्रवेशावेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत, जो निराधार आहे, असे ते म्हणाले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा मित्र पक्ष आहे. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे सचिव जय पवार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना परांजपे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत कल्पना दिली. परस्पर चर्चेनंतरच परांजपे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला, असे मंत्री सामंत म्हणाले. परांजपे यांनीही कुठेही राष्ट्रवादी नेतृत्वावर नाराजी किंवा टीका केलेली नाही. त्यामुळे परांजपे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न निराधार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

इंधन बचतीसाठी ईव्हीचा वापर वाढवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व मंत्र्यांना काटकसरीचे आदेश दिले होते. उद्योग विभागानेही ईव्ही वाहनांचा वापर वाढवला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवाडांच्या आरोपांमुळे खळबळ

Web Title: Anand paranjpe shiv sena entry after discussion with ncp uday samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Shiv Sena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप
1

म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची ‘ही’ कारणे चर्चेत
2

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची ‘ही’ कारणे चर्चेत

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
3

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
4

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.