Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘5 जुलैपासून आमरण उपोषण करणार’; RTI नियमांवर अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, फुटीर खासदारांवरही टीका

माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले असून 5 जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याचवेळी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 09:51 PM
‘5 जुलैपासून आमरण उपोषण करणार’; RTI नियमांवर अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, फुटीर खासदारांवरही टीका

‘5 जुलैपासून आमरण उपोषण करणार’; RTI नियमांवर अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, फुटीर खासदारांवरही टीका

Follow Us
Follow Us:
  • RTI नियमांविरोधात अण्णा हजारे 5 जुलैपासून आमरण उपोषण करणार.
  • नवे RTI नियम तातडीने मागे घ्या, अशी फडणवीस सरकारकडे मागणी.
  • ठाकरे गटातील फुटीर खासदारांवर टीका; “ध्येयवादी माणूस पक्ष बदलत नाही.”
 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार (RTI) कायद्यात करण्यात आलेल्या नव्या नियमांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. शासनाने 12 जून 2026 रोजी लागू केलेले नियम मागे घेतले नाहीत, तर 5 जुलैपासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षांतर करणाऱ्या खासदारांवरही जोरदार टीका केली.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या sहुलकात वाढ करण्यात येणार असून एकूण 12 नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. या बदलांवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे. शुल्कवाढ, ओळखपत्राची सक्ती आणि ‘एक विषय-एक अर्ज’ यांसारख्या तरतुदींमुळे माहितीचा अधिकार कमकुवत होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हे नियम तातडीने रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले अण्णा हजारे ?

याबाबत बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, “मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याशी चर्चा झाली आहे. ते दोन दिवसांत भेटणार आहेत. त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला तर स्वागतच आहे. मात्र, समाधानकारक निर्णय झाला नाही तर 5 जुलैपासून माझे बेमुदत उपोषण सुरू होईल.”

‘ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,’ एकनाथ शिंदेंची ग्वाही

फुटीर खासदारांवर अण्णा हजारेंचे ताशेरे

ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याच्या घडामोडींवरही अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षांतराच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. याचा अर्थ श्रद्धा नाही, निष्ठा नाही आणि ध्येयवादही नाही. ज्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे, ज्याच्याकडे विचार आणि ध्येय आहे, तो पक्ष बदल करत नाही,” असे अण्णा हजारे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी स्वतःच्या हितासाठी राजकीय भूमिका बदलणाऱ्यांवरही निशाणा साधला. “जे लोक स्वतःचे हित साधण्यासाठी राजकारण करतात, तेच अशा प्रकारे पक्ष बदलतात,” अशी टीका त्यांनी केली.

‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय…,’ 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवरून राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झाले असून अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरावरूनही राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Anna hazare warning indefinite hunger strike rti rules criticism on rebel mps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • Anna Hajare
  • RTI Activist
  • shivsena

संबंधित बातम्या

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
1

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.