Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी

भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचेही अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आलेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2026 | 08:21 PM
Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी
Follow Us
Follow Us:
  • सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात;
  • भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी
भारत रांजणकर :  राज्यात अशोक खरात प्रकरणावरुन मोठ्या प्रमाणात तीव्र पडसाद उमटले आहेत. भोंदू अशोक खरात महिलांचं शोषण करत असल्याची अनेक प्रकरणं पुढे आली. लैंगिक अत्याचार करणाऱ्या या विकृत माणसाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात संवेदनशील वातावरण निर्माण झाल्याचं देखील दिसून येत काही. रुपाली चाकणतकर यांचे देखील या भोंदू अशोक खरात बरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील होत आहे.

अशातच आता सुनील तटकरेंनी भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावल्याचं समोर आलं आहे. स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात हा महिलांवरील अत्याचारामुळे चर्चेत आला. बलात्काराच्या गंभीर आरोपाखील त्याला अटक देखील करण्यात आली. नाशिकमधल्या त्याच्या घरातून शस्त्रे, काडतुसे जप्त करण्यात आली असून अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटींशी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे तर खरातशी जवळचे संबंध आहेत. चाकणकर त्यांच्या शिष्या आहेत. चाकणकरांनी त्यांचे पाद्यपूजन करताना, त्यांच्या डोक्यावर छत्री धरतानाचे असे अनेक फोटो, तसचे व्हिडीओ यापूर्वी समोर आले होते. पण एवढंच नव्हे तर इतरही अनेक राजकारणी नेत्यांचे खरात यांच्याशी संबंध असून एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यासोबतचे फोटोही उघड झाले. मात्र याच प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचेही अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आलेत.

Rupali Chakankar News: भोंदूबाबाचे कारनामे भोवले! महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश?

 

सुनील तटकरे यांनी खरात यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली होती, त्यावेळचे त्यांचे काही फोटो समोर आले असून तटकरे यांची त्या वेळची पोस्टही व्हायरल झाली आहे. त्या लग्नात तटकरे यांच्यासोबत दीपक केसरकर हेही उपस्थित असल्याचे दिसून आले. ” आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे चि. शुभम आणि चि. सौ. कां. त्रिप्तबाला यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून, नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंदी सहजीवनासाठी शुभाशीर्वाद दिले.” अशी पोस्ट लिहीत तटकरे यांनी लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. एका फोटोत त्यांच्या शेजारी भोंदू बाबा अशोक खरात हे बसलेले दिसत आहेत. हेच फोटो आता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वातावरण संवेदनशील झाल्याचं समोर येत आहे.

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

Web Title: Ashok khaat sunil tatkare in the middle of controversy tatkars presence at the wedding of impostor ashok khaats son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
2

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार
3

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
4

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.