Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

राहुल गांधींचा 'छत्रौं की गुंज' हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस आणि प्रशासनाने आधीच अनेक अटी लागू केल्या आहेत. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या भांडणानंतर सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 22, 2026 | 10:29 AM
Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींचा दौरा: पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी पुण्यात
  • शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ; राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
Rahul Gandhi Pune Visit: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज (22ऑगस्ट) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसने आयोजित केलेल्या छात्रो की गुंज या कार्यक्रमात ते शहरातीली तरुण- तरुणींशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील आरटीओजवळील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे.  या कार्यक्रमासाठी तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेमोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात

कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दोन टप्प्यांत नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच कार्यक्रम परिसरावर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जाणार आहे.

राहुल गांधींच्या 8 तासांच्या ठिय्यानंतर FIR दाखल; म्हणाले, ‘न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल’

वाहतूक व्यवस्थेसाठी ७०० पोलिसांचा बंदोबस्त

मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार असल्याने परिसरातील वाहतुकीवरही ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला असून, गर्दी वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पुण्यात एक दिवस आधी ABVP आणि NSUI मध्ये मोठा राडा

राहुल गांधींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सीओईपी कॉलेजच्या आवारात आणि वसतिगृहात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापले. या घटनेची माहिती मिळताच, काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झाले.

राहुल गांधींच्या आंदोलनाला यश! पेलेट गन प्रकरणात FIR दाखल करण्यास दिल्ली पोलिसांची तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या आवारात आंदोलन सुरू केले. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनी धरणे आंदोलन केले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनंतर, दोन काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. दोघांनाही उपचारासाठी सांचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे काँग्रेस नेत्यांनी जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी तणाव

राहुल गांधींचा ‘छत्रौं की गुंज’ हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस आणि प्रशासनाने आधीच अनेक अटी लागू केल्या आहेत. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या भांडणानंतर सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Web Title: Pune newsclash at coep college pune before rahul gandhi visit congress leaders protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • ABVP
  • Congress Politics
  • Maharashtra Politics
  • NSUI
  • Pune Politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
2

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
3

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
4

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.