Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बापाचा माल आहे का?” CJP आंदोलनावरून भाजप नेत्याची मुक्ताफळे, ‘दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने मोदीजी..’

दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अभिजित दिपके यांच्यावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 03:08 PM
"बापाचा माल आहे का?" कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून भाजप नेत्याची मुक्ताफळे

"बापाचा माल आहे का?" कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून भाजप नेत्याची मुक्ताफळे

Follow Us
Follow Us:
  • अतुल भातखळकरांनी CJP आंदोलनावर जोरदार टीका केली
  • मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीवर ‘बापाचा माल आहे का?’ अशी प्रतिक्रिया
  • प्रसाद लाड यांनीही अभिजित दिपके यांच्या आंदोलनावर निशाणा साधला
 

देशभरातून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला (CJP आंदोलन) मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून आंदोलनाची ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या आंदोलनावर टीका करत मुक्ताफळे उधळली आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनामा मागणीसंदर्भात “बापाचा माल आहे का?” म्हणत टीका केली आहे.

दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आज (सोमवार, 20 जुलै ) दिल्लीत मोठे आंदोलन होत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!’ भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ, जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा

अतुल भातखळकरांची CJP आंदोलनावर जहरी टीका

अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे.”

कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 19, 2026

अतुल भातखळकरांच्या वक्तव्याला आता मोठा विरोध होत असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचे तसेच लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा आणि राजीनाम्याची मागणी करण्याचाही अधिकार संविधानाने दिला असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.

Mallikarjun Kharge: ‘विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, पण हे सरकार…’, राज्यसभेत पेपर लीक प्रकरणावर खर्गे आक्रमक

भाजप आमदार प्रसाद लाड यांचीही टीका

भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही ‘X ‘ वर पोस्ट करत अभिजित दिपकेंवर टीका केली. ते म्हणाले, “अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी! लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे. NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…”

अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी! लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे.
NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…… pic.twitter.com/D4WdS4hYqZ
— Prasad Lad (@PrasadLadInd) July 19, 2026

एकीकडे सत्ताधारी या शांतीपूर्ण आंदोलनाला विरोध करत आंदोलकांवर टीका करत आहेत. तर, विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असल्याचे दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या टीकेला आता विरोधक तसेच सामान्य लोकांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली असून लोकशाहीत शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असल्याची आठवण सत्ताधाऱ्यांना करून देण्यात येत आहे.

Web Title: Atul bhatkhalkar criticizes cjp protest abhijit dipke narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • BJP
  • CJP
  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
1

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.