Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरसकट कर्जमाफीशिवाय सरकारकडे पर्याय नाही,’ बाळासाहेब थोरातांचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 13, 2026 | 02:51 PM
Balasaheb Thorat support Rohit Pawar hunger strike protest

Balasaheb Thorat support Rohit Pawar hunger strike protest

Follow Us
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, यावरून राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे. सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न पाहण्याचे आवाहन करत “सरसकट कर्जमाफी शिवाय आता पर्याय नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

बाळासाहेब थोरातांचा अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारनेही या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. आज शेतकरी सर्वार्थाने अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत नियमांच्या कचाट्यात अडकवून त्याला तुटपुंजी कर्जमाफी देणे योग्य ठरणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी दिली तरच ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.”

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारनेही या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. आज शेतकरी सर्वार्थाने अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत नियमांच्या कचाट्यात अडकवून त्याला तुटपुंजी… pic.twitter.com/w9837FuiVX — Balasaheb Thorat (@bb_thorat) June 13, 2026

पुढे ते म्हणाले, “रोहित पवार यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. सरकारने या विषयावर तातडीने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरसकट कर्जमाफी शिवाय आता पर्याय नाही हे सरकारने लक्षात घ्यावे.” बाळासाहेब थोरातांच्या या ट्विटनंतर आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

रोहित पवारांची मागणी काय ?

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. विनाअट सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवर देखील रोहित पवारांनी भाष्य करून सरकारकडे मागण्या केल्या आहेत. रोहित पवारांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची आमची सरकारकडं मागणी आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना फायदा होईल.”

आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५००… pic.twitter.com/a5gEaw4lyf — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2026

“तसंच नाफेडच्या माध्यमातून २ लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली खरी, पण गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ १०० टन इतक्याच कांद्याची खरेदी करण्यात आली. संथ गतीने चालणारी यंत्रणा, जाचक अटी यामुळं कांदा खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु असून परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ येत आहे. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, नाफेड, एनसीसीएफ आणि वखार महामंडळ या सर्व यंत्रणांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि कांदा खरेदी करताना ज्या जाचक नियमांची फूटपट्टी लावली जाते, त्याही शिथिल करण्यात याव्यात, ही विनंती!” असे ते यावेळी म्हणाले.

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

Web Title: Balasaheb thorat support rohit pawar hunger strike protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Balasaheb Thorat
  • Farmer Loan Waiver
  • Farmer Protest
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका
1

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

Sadabhau Khot on Rohit Pawar: १०० उंदीर खाऊन मांजर हजला चालली; रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनावर सदाभाऊ खोतांचा घणाघाती वार
2

Sadabhau Khot on Rohit Pawar: १०० उंदीर खाऊन मांजर हजला चालली; रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनावर सदाभाऊ खोतांचा घणाघाती वार

पंढरपुरात रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन’, २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मागणी
3

पंढरपुरात रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन’, २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मागणी

संपूर्ण कर्जमाफी करा ! शक्तिपीठ महामार्ग रद्द करा ! धाराशिवमध्ये कॉंग्रेसचे आंदोलन, कर्जमाफीच्या जीआरची केली होळी
4

संपूर्ण कर्जमाफी करा ! शक्तिपीठ महामार्ग रद्द करा ! धाराशिवमध्ये कॉंग्रेसचे आंदोलन, कर्जमाफीच्या जीआरची केली होळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.