Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election 2026 : बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार? पोटनिवडणूक बिनविरोध होणार की लढणार?

अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. यामध्ये निवडणूक बिनविरोध होणार की लढवली जाणार याची चर्चा सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 04:05 PM
Baramati Bypoll 2026 Will the Election Be Uncontested After Ajit Pawar baramati politics

Baramati Bypoll 2026 Will the Election Be Uncontested After Ajit Pawar baramati politics

Follow Us
Follow Us:
  • बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता
  • अजित पवारांनंतर कोण होणार बारामतीचा दादा
  • राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण
Baramati By Election : पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील काही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुण्यातील बारामती (Baramati News) मतदारसंघ आणि अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघाचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या बारामती मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार की निवडणूक लढवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)

दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी बारामती मतदारसंघ हा सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर होणाारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे बारामतीकर काकांना साथ देणार की पुतण्याला साथ देणार याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे बारामती विधानसभा निवडणुकीवेळी पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली होती. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

हे देखील वाचा : महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणूक! निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये पोटनिवडणुकीच्या घोषणेची शक्यता

मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती ही दादांची असल्याचे सिद्ध झाले होते. बारामतीकरांनी अजित पवारांना मतदानरुपी दान देत त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवले. मात्र अवघ्या दीड वर्षात अजित पवारांचे अपघाती दुर्दैवी निधन झाल्याने बारामतीमध्ये पोटनिवडणुकीची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे कोणताही नेता वारल्यानंतर त्याच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला जात नाही.

महाराष्ट्राची हीच राजकीय संस्कृती पुढे चालवली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गट कोणताही उमेदवार देणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र जर उमेदवार देण्याचे निश्चित झाले तर पुन्हा एकदा युगेंद्र पवारांना संधी दिली जाणार का आणि बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का याची चर्चा सुरु झाली आहे.

हे देखील वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा

पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत,” असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Web Title: Baramati bypoll 2026 will the election be uncontested after ajit pawar baramati politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Baramati Politics

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी  सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना  पालिकेकडे हस्तांतरित
2

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
3

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!
4

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.