Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“Ajit Pawar यांनी सत्तेचा गैरवापर करून…”; काळुराम चौधरी यांचे आरोप आहेत तरी काय?

बारामती तालुक्यातील अनेक महारवाटनाच्या जमिनी बेकायदा शासनाच्या नावावर करून त्या इतर कामासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडून बौद्ध समाजाला भूमिहीन करण्यास भाग पाडल्याचे चौधरी यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2025 | 08:22 PM
“Ajit Pawar यांनी सत्तेचा गैरवापर करून…”; काळुराम चौधरी यांचे आरोप आहेत तरी काय?
Follow Us
Close
Follow Us:

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून बारामती परिसरासह तालुक्यातीलही महार वतनाच्या जमिनी अधिकाराचा गैरवापर करून लाटण्याचा आरोप भोजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी केला, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महार वतनाची जमीन लाटली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील. महार वतनाच्या जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण राज्यात गाजत असतानाच काळूराम चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले.

बारामती तालुक्यातील व राज्यभरातील महार वतनाच्या जमिनी बळकवल्याबाबत चौकशी करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. सदर पत्रात महार वतनाच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या हस्तकांच्या नावे बऱ्याच प्रमाणात बळकावून समाजाला भूमिहीन केले आहे. यात अनेक महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठी बातमी! Parth Pawar यांच्यावर आरोप झालेल्या ‘त्या’ जमिनीचा व्यवहार रद्द; अजित पवारांनी दिली माहिती

कधीच जमीन घोटाळ्यात पार्थ पवार असं करणार नाही’ सुप्रिया सुळे यांच्या या वक्त्यावर  विचारलेल्या प्रश्नावर चौधरी म्हणाले, सुळे यांनीही बारामती तालुक्यातील गोजुबावी गावातील महार वतनाची जमीन लाटली आहे. शारदानगर येथील शिक्षण संकुल ही महार वातनाच्या जमिनीवर उभारले आहेत, त्याचबरोबर मेडद येथील मागासवर्गीयांची जमीन ग्रामपंचायत चा ठराव करून अजित पवार यांनी खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याचे चौधरी यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील अनेक महारवाटनाच्या जमिनी बेकायदा शासनाच्या नावावर करून त्या इतर कामासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडून बौद्ध समाजाला भूमिहीन करण्यास भाग पाडल्याचे चौधरी यांनी सांगितले. सोनगाव येथील एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीच्या नावावरील जमीन देखील १९९० नंतर अजित पवार यांनी त्यांच्या मुलाच्या नावे केल्याचा पुरावा देखील आपल्याजवळ असल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे. वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Bhojan samaj party leader kaluram choudhri criticizes to ajit pawar and supriya sule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • supriya sule

संबंधित बातम्या

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत
1

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत

सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर
2

सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा
3

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Chatrapati Sambhajinagar मध्ये सतीश चव्हाण ठरले ‘धुरंधर’, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, प्रशांत बंब यांना धक्का
4

Chatrapati Sambhajinagar मध्ये सतीश चव्हाण ठरले ‘धुरंधर’, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, प्रशांत बंब यांना धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.