Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : ‘त्या’ क्लिपद्वारे भाजप आमदारांना करतोय ब्लॅकमेल; शिवसेना नेते गोटेंचा गंभीर आरोप

भोंदूबाबा खरात प्रकरणाचा संदर्भ देत गोटे यांनी समाजात स्थान असता कामा नये, असे सांगत संबंधित भोंदू बाबावर तत्काळ 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 08:25 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:

धुळे : राज्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशोक खरातचे अनेक नेतेमंडळींसोबतचे फोटो व्हायरल होत आहे. त्यातच आता शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील 39 आमदारांना खरात प्रकरणातील क्लिप्सचा आधार घेऊन भाजप ब्लॅकमेल करत असून, सत्तेसाठी गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचा खळबळजनक दावा गोटे यांनी केला आहे.

भोंदूबाबा खरात प्रकरणाचा संदर्भ देत गोटे यांनी समाजात स्थान असता कामा नये, असे सांगत संबंधित भोंदू बाबावर तत्काळ ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. ज्यांनी या लिंगपिसाटगिरीला खतपाणी घातले, त्यांना सरकार कधी बेड्या ठोकणार? की सत्ताधारी पक्षाचे कवच असल्याने त्यांना सोडून दिले जाणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. अनिल गोटे म्हणाले की, पहाटे कोंबडा आरवतो, तशा रोज नवनवीन घोषणा मुख्यमंत्री करतात. मात्र, या घोषणांची अंमलबजावणी शून्य आहे. नुसत्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवा, असा प्रश्न उपस्थित केला.

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

सत्तेसाठी पोलिस व प्रशासनाचा गैरवापर

सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना वाचवण्यासाठी पोलिस व प्रशासनाचा वापर केला जात आहे. मात्र, ही दडपशाही फार काळ चालणार नाही. आगामी काळात या अन्यायाविरोधात जनतेच्या न्यायालयात आवाज उठवू, असा इशाराही अनिल गोटे यांनी दिला आहे.

सरकारला तीन प्रश्न

– गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी आणि आमदारांना दबावाखाली ठेवण्यासाठी केला जात आहे का?

– संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप नेते ‘एकालाही सोडणार नाही’ अशा वल्गना करत होते, मग आजही संबंधित आरोपी मोकाट का?

– धुळे ‘गुलमोहर’ प्रकरण गुलमोहर बंगल्यावर सापडलेल्या करोडो रुपयांच्या प्रकरणाचे पुढे काय झाले? अद्याप ठोस कारवाई का नाही?

Ashok Kharat Case : खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 4650 ‘त्या’ व्हिडिओ क्लिप्स हटवल्या

Web Title: Bjp blackmailing its mlas using video clips shiv sena leader anil gote allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Abused Case
  • Ashok Kharat Case
  • crime news

संबंधित बातम्या

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
1

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
2

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
3

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
4

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.