Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापनदिनाच्या मंचावरच म्यूट,’ भाजपची संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड

शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापनदिन मेळाव्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊतांना भाषणाची संधी न मिळाल्याने पक्षातील त्यांची घटती किंमत दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 20, 2026 | 06:23 PM
'इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापनदिनाच्या मंचावरच म्यूट,' भाजपची संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड

'इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापनदिनाच्या मंचावरच म्यूट,' भाजपची संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड

Follow Us
Follow Us:
  • शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित 
  • संजय राऊतांनी भाषण न केल्याने नव्या राजकीय चर्चा
  • भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची जोरदार टीका
 

शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून काल (19 जून) ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी स्वतंत्रपणे वर्धापनदिन साजरा केला. अश्यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. एकीकडे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली खळबळ आणि ‘ऑपरेशन टायगर’नंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र खासदार संजय राऊत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले नाही. यावरून आता नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

यावरूनच आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर चांगलीच टीका केली आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून संजय राऊतांना लक्ष करून त्यांनी “उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही!” म्हणत संजय राऊतांना ‘भोंगा‘ म्हणत डिवचले आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारानंतर आता आमदारही फुटणार? आमदाराने नेमकं काय म्हटलं…

काय म्हणाले नवनाथ बन ?

नवनाथ बन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून संजय राऊतांवर टीका करत म्हंटले, “उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षाच्या वर्धापन दिनातच बाजूला बसवण्याची वेळ आली, यावरून उबाठामधील त्यांची घटती किंमत आणि वाढती अस्वस्थता स्पष्ट होते.”

उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत… pic.twitter.com/gf3Sru6kka — Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 20, 2026

“आदित्य ठाकरे विरूध्द संजय राऊत यावर अधिकृत शिक्कामोर्तब” – नवनाथ बन

आपल्या ट्विटमधून पुढे ते म्हणाले, “कालपर्यंत संपूर्ण पक्षाला रिमोटने चालवण्याचा आव आणणाऱ्या संजय राऊतांचा स्वतःचाच रिमोट आदित्य ठाकरे यांनी काढून घेतल्याचं दिसलं. रोज इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापन दिनाच्या मंचावरच म्यूट करण्यात आला. यातून आदित्य ठाकरे विरूध्द संजय राऊत या सामन्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं!” असे विधान त्यांनी यावेळी केले.

‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय

संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वर्धापनदिन भाषणादरम्यान फुटीर खासदारांबाबत बोलताना “हा तर फक्त ट्रेलर आहे, खरा चित्रपट अजून बाकी आहे,” असे विधान केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत आज (शनिवार, 20 जून) म्हणाले, “तुम्ही एकनाथ शिंदे यांना इतके गांभीर्याने का घेता? त्यांना गांभीर्याने घेणे थांबवा. ते काही महान व्यक्ती नाहीत. ते एक बेईमान नेते आहेत, तरीही तुम्ही त्यांना गांभीर्याने घेता? तुम्ही सुवेंदू अधिकारी यांनाही गांभीर्याने घेता. ही बेईमान माणसे आहेत. त्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला आहे. जोपर्यंत ते सत्तेत आहेत आणि त्यांच्या हातात पैसा आहे, तोपर्यंत ते अशीच विधाने करत राहतील…”

Web Title: Bjp navnath ban slams sanjay raut after shiv sena anniversary rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
2

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
3

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
4

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.