Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “औरंगजेबाचा DNA असणाऱ्यांनी उंदीर होऊन मुंबई पोखरली…; खासदार संजय राऊतांना भाजप नेत्यांनी डिवचलं

खासदार संजय राऊत यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन टीका केली. यानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी राऊतांवर जोरदार खरपूस समाचार घेतला. राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 29, 2025 | 03:19 PM
BJP Navnath Ban target sanjay raut over nashik Simhastha Kumbh Mela political news

BJP Navnath Ban target sanjay raut over nashik Simhastha Kumbh Mela political news

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार संजय राऊतांची सिंहस्थ कुंभमेळ्यावर टीका
  • भाजप नेते नवनाथ बन यांनी टीका केली
  • संजय राऊतांचा डीएनए औरंगजेबाचा असल्याची टीका केली.

Maharashtra Politics: पुणे : नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये व्यवस्था, प्रशासन आणि सरकारतर्फे जोरदार तयारी सुरु आहे. मात्र विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले. खासदार संजय राऊत यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन टीका केल्यानंतर भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची बोचरी टीका केली आहे. हिंदू सणांबद्दल आकस असल्यानेच संजय राऊतांचा नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध असल्याचे नवनाथ बन म्हणाले आहेत.

भाजप नेते नवनाथ बन म्हणाले की, “औरंगजेबाचा डीएनए असणाऱ्या खासदार संजय राऊतांना हिंदू सणांबद्दल आकस आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध करण्याचे काम अपशकुनी राऊत मामा करत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याला फुटकळ कारणे पुढे करून त्यांनी विरोध केला. मात्र मुस्लीमांचा इज्तेमा असता तर राऊतांनी त्यांचे स्वागत केले असते. नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध नसतानाही, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या तालावर नाचत, राजकीय भांडवल करत सिंहस्थ कुंभमेळ्यावर राऊत टीका करत आहेत,” अशा शब्दांत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, “जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामीनावर बाहेर आहेत, ज्यांनी 100 दिवस तुरुंगाची हवा खाल्ली, पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसांची ज्यांनी घरे लाटली असे राऊत हे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात हेच हास्यास्पद आहे अशी टीका नवनाथ बन यांनी केली. राऊत यांनी त्यांची भांडुप आणि अलिबागमधील मालमत्तेच्या विक्रीस सुरुवात करावी आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी शेतक-यांना मदत करावी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या कार्यकाळात रोज 100 कोटींची वसुली करून 9.5 लाख कोटीं जमा केले होते त्या पैशांनी शेतक-यांना मदत करावी म्हणजे शेतक-यांचा सातबारा कोरा होण्यास हातभार लागेल,” असा खोचक सल्ला भाजप नेत्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

नवनाथ बन म्हणाले की, “संजय राऊत यांना शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने शेतकऱ्यांना दमडी देखील दिली नाही. बांधावर जाऊन पंचवीस हजार रुपये हेक्टरी देऊ अशा बाता मारल्या मात्र मदत केलीच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ओल्या दुष्काळातून शेतक-यांना बाहेर काढण्यास प्राधान्य असून टप्प्याटप्प्याने मदत केली जात आहे. लवकरच सातबारा देखील कोरा केला जाईल असे त्यांनी नमूद केले. ओल्या दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतक-यांसाठी महायुती सरकारने आधी 32 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. काल आणखी 11 हजार कोटींची मदत शेतक-यांच्या खात्यात कशी पोहोचेल यासाठी कॅबिनेट बैठक घेतली. आत्तापर्यंत 40 लाख शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचलेत. शेतक-यांच्या नावावर आंदोलन करणा-या बच्चू कडूंनी आंदोलनाऐवजी काँग्रेसला याबाबत प्रश्न विचारावे असे आव्हान भाजप नेत्यांनी दिले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय राऊतांनी अलिबागमध्ये शेतकऱ्यांचे सातबारा खाल्ले

पुढे नवनाथ बन म्हणाले की, “उंदीर लोकांचे, शेतकऱ्यांचे धान्य खातो त्याप्रमाणे संजय राऊतांनी मुंबई पालिकेतील खिचडी गट्ट केली, पत्रा चाळीतली घरे खाल्ली, अलिबागमध्ये शेतक-यांचे सातबारे खाल्ले, कफन घोटाळा करून जनतेचे पैसे खाल्ले असा घणाघात नवनाथ बन यांनी केला. ‘ॲनाकोंडा’ म्हणत आमच्यावर टीका करणारे उबाठा आणि राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करत आहेत,” असे टीकास्त्र नवनाथ बन यांनी सोडले.

 

Web Title: Bjp navnath ban target mp sanjay raut over nashik simhastha kumbh mela political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • BJP Politics
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका
1

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
2

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
3

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप
4

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.