Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. यामुळे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपनेच जाळे टाकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 16, 2025 | 03:18 PM
Dhule news

Dhule news

Follow Us
Close
Follow Us:

BJP Thane Meeting : ठाणे : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी मुंबईसह सर्वच महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी दाखवल अब की बार 70 पार असा नारा दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपनेच जाळे टाकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपने ग्राऊंड वर्किंग सुरु केले आहे. प्रत्येक भागासाठी सुक्ष्म चर्चा आणि प्लॅनिंग केले जात आहेत. दरम्यान, ठाण्यासाठी देखील भाजप जोरदार आखणी करत असून या संदर्भात भाजपची आढावा झाली आहे. यामध्ये ठाण्यात महापौर हा भाजपाचाच होणार असल्याचा विश्वास देखील भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपने हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. यावेळी स्वबळाचा नारा देत अधिकाधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र यामुळे एकप्रकारे एकनाथ शिंदेंच्या ठाण्याला भाजप सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने पक्ष कार्यालयात अभ्यास वर्गाचे आयोजन केले . या ठिकाणी इच्छुक उमेदवारांचे परिचय पत्र भरून घेण्यात आले. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभ्यास वर्ग घेण्यात आला. या अभ्यास वर्गात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ठाण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन सांगण्यात आला.

महायुतीचा वाद चव्हाट्यावर 

राज्यात सत्तेवर असलेली महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे शिंदे सेनेवर सातत्याने टीका करत आहेत तर खासदार नरेश म्हस्के हे नाईकांना प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे ठाण्यातील महायुतीमधील संबंध ताणले गेले आहेत. महापौरपद भाजपाच्या वाट्याला यावे, अशी इच्छा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. तर त्यांना उत्तर देताना उदय सामंत बोलले की काही लोकांनी युतीबद्दल उंची पाहून बोलावं. असे वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये महायुतीत सुरु आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय म्हणाले शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के?

“महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा लढलो, आता नागरिकांसमोर जाताना ठाणे महापालिकेत युती म्हणून लढावं ही आमची इच्छा आहे. समोरच्याची इच्छा नसेल, तर गेली 10 वर्ष त्याच्याआधी सुद्धा वेगवेगळे लढून एकहाती सत्ता आणतच होतो. त्यामुळे आमची प्रत्येक वॉर्डात तयारी आहे. पण राज्यातील युतीचे नेते जो निर्णय घेतील, त्याचं आम्ही पालन करु“ असं ठाण्यातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

Web Title: Bjp thane overview meeting for local body elections 2025 against eknath shinde political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Eknath Shinde
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

“मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत?” उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले ‘हे’ 7 धडकी भरवणारे प्रश्न
1

“मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत?” उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले ‘हे’ 7 धडकी भरवणारे प्रश्न

“ना विचार, ना भूमिका; फक्त….”, महापालिका निकालांवरून ‘सामना’तून प्रहार; एकनाथ शिंदेंवर ‘शहा सेना’ म्हणून टीका
2

“ना विचार, ना भूमिका; फक्त….”, महापालिका निकालांवरून ‘सामना’तून प्रहार; एकनाथ शिंदेंवर ‘शहा सेना’ म्हणून टीका

BMC Mayor: ‘खाई त्याला खवखवे’, शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना पंचतारांकित ‘कारावासात’ ठेवणार एकनाथ शिंदे, महापौर होईपर्यंत चक्क…
3

BMC Mayor: ‘खाई त्याला खवखवे’, शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना पंचतारांकित ‘कारावासात’ ठेवणार एकनाथ शिंदे, महापौर होईपर्यंत चक्क…

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.