महायुतीच्या खातेवाटपामध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांना जबाबादारी देण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण रंगले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडाभरानंतर खातेवाटप जाहीर झाला आहे. अनेक नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले आहेत. काही नवीन नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर काही नेत्यांच्या खात्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास देखील सुरुवात केली आहे.
महायुतीच्या प्रमुख तीन नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. सत्तास्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यावर दावा केला होता. मात्र भाजपने हे खाते त्यांच्याकडे ठेवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते ठेवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याचे तिजोरी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे महायुतीचे अर्थखाते देण्यात आले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील इतर प्रमुख नेत्यांना देखील महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खाते, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज देण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे खाते देण्यात आले आहे.
झिरवाळ, देसाई यांच्याकडे खाती कोणती?
उदय सामंत यांच्याकडे उद्योग, मराठी भाषा हे खाते तर पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक, कल्याण हे खाते शंभूराज देसाई, अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य हे खाते नरहरी झिरवाळ, सामाजिक न्याय खाते हे संजय शिरसाट, वाहतूक हे खाते प्रताप सरनाईक, रोजगार हमी, फलोत्पादन, मिठागर जमीन विकास हे खाते भरत गोगावले यांना दिले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छगन भुजबळांचे खाते कोणाला?
नितेश राणे यांना मत्स्यव्यवसाय, बंदरे हे खाते देण्यात आले आहे. तर माधुरी मिसाळ यांना शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ हे खाते देण्यात आले आहे. पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन हे खाते पंकजा मुंडे यांना तर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे विभाग धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण, दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण, संजय राठोड यांना माती व पाणी परीक्षण खात ही खाती मिळाली आहेत. सार्वजनिक बांधकाम हे खाते शिवेंद्रराजे भोसले, कृषी खाते माणिकराव कोकाटे, ग्रामविकास आणि पंचायत राज यांच्याकडे जयकुमार गोरे, सहकार खाते बाबासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे अन्न व नागरी पुरवठा हे खाते आता धनंजय मुंडेंना मिळाले आहे. त्यामुळे आता खातेवाटप जाहीर झाले असून लवकरच राज्याच्या कामकाजाची घडी नीट बसणार आहे.