कलियुगातला नवसाला पावणारा देव म्हणजे महायुतीचे भरत गोगावले; सुरेश महाडीकांचे वक्तव्य
विरोधक जिजामात जयंतीला उपस्थित राहत नाहीत, शिवजयंतीला उपस्थित राहत नाहीत, राज्याभिषेकाला उपस्थित राहत नाहीत, मग अशा परिस्थितीत त्यांना मतदारांनी मत कसे द्यायचे, असा सवाल करत सुरेश महाडिक यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. भरत गोगावले यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना सुरेश महाडिक यांनी हा सवाल उपस्थित केला. पाचाड पंचक्रोशीतील एकही काम शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही भरत गोगावले यांनी पाचाड येथील प्रचार सभेवेळी दिली आहे.
हेदेखील वाचा- Nitin Raut Car Accident: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारचा अपघात, प्रचाराहून घरी परत असताना…
महाड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार, शिवसेना पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ पाचाड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश महाडिक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सुरेश महाडिक यांनी सांगितलं की, खोटं बोला पण रेटून बोला अशी सवय विरोधकांना झाली आहे. पाचाड पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायतीतून भरत गोगावले यांना विक्रमी मतदान होणार असल्याचा विश्वास सुरेश महाडिक यांनी व्यक्त केला.
विरोधक ज्या रस्त्यानी गावात जातात ते रस्ते देखील भरत गोगावलेंच्या माध्यमातून झाले असल्याचा टोला देखील महाडीक यांनी विरोधकांना लगावला. कलियुगातला नवसाला पावणारा देव म्हणजे भरत गोगावले आहेत, असा उल्लेख प्रचार सभेवेळी महाडिक यांनी केला. प्रचार सभेवेळी महाडिक यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
हेदेखील वाचा- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नरिमन पॉइंटवरून अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणार विरार,काय आहे प्रकल्प?
महाड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ पाचाड येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मा. जि. परिषद सदस्य संजय कचरे, सुरेश महाडिक, विजय सावंत, तालुका प्रमुख बंधू तरडे, देवदास गायकवाड,पाचाड ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, किल्ले रायगड गाईड संघटनेचे पदाधिकारी, वृद्ध महिला, पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार आमदार भरत गोगावले यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी व वृद्धांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना दिली. महायुती सरकारने देवदर्शन योजना आणली, यामुळे मुस्लिम बांधव अजमेर, बौद्ध बांधव दीक्षाभूमी नागपूर तर हिंदू बांधव पंढरपूर, आळंदी सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ शकतात. यासाठी महायुती सरकार प्रत्येकी तीस हजार रुपयाचे अनुदान देत असल्याची माहिती भरत गोगावले यांनी या प्रचारसभेवेळी दिली.
वृद्धापकाळासाठी पेन्शन योजना महायुती सरकार नव्याने चालू करणार असल्याचे आश्वासित केले आहे. आपल्या विभागाला पाण्याची टंचाई भेडसावणार नाही याची मी आमदार म्हणून काळजी घेणार आहे. पाच वर्ष मी सेवेकरी म्हणून काम करतोय आणि यापुढेही करेन. पाचाड पंचक्रोशीतील एकही काम शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही देखील भरत गोगावले यांनी यावेळी दिली आहे.