पंजाबचे मुख्यमंत्री Bhagwant Mann यांच्या Fake Video प्रकरणी न्यायालयाचा मोठा आदेश (Photo Credit- X)
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान (Bhagwant Singh Mann) यांचा मॉर्फ केलेला (Morph) आणि आक्षेपार्ह ‘डीपफेक’ (Deepfake) व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी मोहाली न्यायालयाने (Mohali Court) कठोर आदेश जारी केला आहे. या प्रकरणात Facebook, X (Twitter), YouTube, Telegram आणि Instagram या सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या खात्यांवरून पोस्ट केलेले संबंधित व्हिडिओ २४ तासांच्या आत काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपाखाली कॅनडास्थित जगमन समरा यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला होता. आम आदमी पक्षाने (आप) म्हटले आहे की, व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यांनाही इशारा देण्यात आला आहे.
पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान जी का एक AI Deep fake video सोशल मीडिया पर Right Wing Trolls द्वारा Share किया जा रहा है। यह Video पूरी तरह से Fake है, जिसे हटाने का आदेश माननीय कोर्ट द्वारा जारी कर दिया गया है। pic.twitter.com/x5pMLZiriZ — AAP (@AamAadmiParty) October 23, 2025
मोहाली न्यायालयाने या प्रकरणात आता एक नवीन आणि कठोर आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सर्व खात्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सायबर गुन्हे विभागाकडून सूचना मिळाल्यानंतर न्यायालयाने सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मना अशा सर्व आक्षेपार्ह पोस्ट त्वरित काढून टाकण्याचे आणि ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त, गुगललाही असे निर्देश देण्यात आले आहेत की, अशी सामग्री सर्च रिझल्टमध्ये दिसू नये याची खात्री करावी. न्यायालयाने या संपूर्ण कारवाईचा अहवाल १० दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या व्हिडिओभोवतीचा वाद आणखी वाढला आहे. भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल हे या बनावट व्हिडिओच्या प्रसारामागे आहेत. दुसरीकडे, हा व्हिडिओ कथितपणे समरा यांनी फेसबुकवर अपलोड केला होता, ज्यांनी असा दावा केला होता की, जो कोणी हे व्हिडिओ एआयने (AI) तयार केले आहेत हे सिद्ध करू शकेल, त्याला ५ कोटींचे रोख बक्षीस मिळेल.






