काशिमीरा येथील जनता नगर परिसरात समाजसेविका बालमा बाजी या महिला आपल्या परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छताबाबत पाहणी करत असताना संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका तरुणाला त्यांनी पाहिले. तो तरुण बराच वेळ शौचालयाजवळ बसून असल्याने बामण्णा यांना संशय आला. त्यांनी त्या तरुणाची चौकशी केल्यावर त्याच्या अंतर्वस्त्रात दहा “गांजाच्या पुड्या” (अमली पदार्थाचे पाकीट) आढळून आले. समाजसेविकेने तत्काळ 112 वर कॉल करून काशिगाव पोलीस ठाण्यास कळवले, मात्र पोलिसांनी “आम्ही दुसऱ्या कामात व्यस्त आहोत, सध्या येऊ शकत नाही” असे उत्तर दिल्याचे सांगितले जाते.






