भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील निवडणूक अधिकारी पैसे घेऊन मतदार यादीत नावं नोंदवतात असा गंभीर आरोप केल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे.मनसेच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत, या आरोपांवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमदार म्हात्रे या संविधानिक पदावर असून त्यांचं वक्तव्य अतिशय गंभीर असल्याचं मनसेने म्हटलं आहे.त्यामुळे हे अधिकारी कोण आहेत, त्यांनी कोणती नावं मतदार यादीत नोंदवली याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.






