बंगळूरु, दिल्लीत स्कॅमर्सचा धुमाकूळ! ३० हजार नागरिकांची १५०० कोटींची फसवणूक (Photo Credit- AI)
Investment Scams: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेने (Cyber Wing) ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीबाबत नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत भारतातील ३०,००० हून अधिक लोकांची गुंतवणूक फसवणुकीच्या नावाखाली १,५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्यात बळी पडलेल्यांपैकी ६५ टक्के प्रकरणे एकट्या बंगळूरू, दिल्ली-एनसीआर आणि हैदराबादमध्ये घडली आहेत.
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या अहवालानुसार, बंगळुरूला सर्वाधिक आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, जे एकूण नुकसानीच्या एक चतुर्थांश (२६.३८ टक्के) आहे. घोटाळेबाजांनी ३० ते ६० वयोगटातील (नोकरदार) लोकांची सर्वाधिक फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांपैकी ७६ टक्क्यांहून अधिक लोक या वयोगटातील आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत व्यक्तींच्या आकांक्षांचा फायदा घोटाळेबाज घेत आहेत.
𝟑𝟎,𝟎𝟎𝟎 𝐩𝐞𝐨𝐩𝐥𝐞 𝐝𝐮𝐩𝐞𝐝 𝐨𝐟 𝐑𝐬 𝟏,𝟓𝟎𝟎 𝐜𝐫𝐨𝐫𝐞, 𝐁𝐞𝐧𝐠𝐚𝐥𝐮𝐫𝐮, 𝐃𝐞𝐥𝐡𝐢 𝐰𝐨𝐫𝐬𝐭 𝐡𝐢𝐭: 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐞 Investment scams have resulted in financial losses exceeding Rs 1,500 crore for over 30,000 people in India’s top cities in the last six months.… pic.twitter.com/LkZXgVnYpA — IndiaToday (@IndiaToday) October 24, 2025
नोंदवलेले घोटाळे किरकोळ नसून त्यात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतलेले आहेत. प्रत्येक पीडिताला सरासरी अंदाजे ₹५१.३८ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीमध्ये दरडोई नुकसान सर्वाधिक आहे, जिथे पीडितांना सरासरी ८ लाखांचे नुकसान झाले आहे. ८.६२ टक्के (अंदाजे २,८२९ जण) ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही लक्ष्य झाले आहेत.
सायबर गुन्हेगार घोटाळे करण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत.
वेळीच सावध व्हा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?






