Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुजबळ – महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण, नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून मोठे विधान

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांवर आता स्वतः भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही अबोला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 04:26 PM
भुजबळ - महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

भुजबळ - महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून भुजबळांनी व्यक्त केला संताप
  • गिरीश महाजनांशी मतभेदांच्या चर्चांना भुजबळांचा नकार
  • “हे मीडियाने तयार केलेले चित्र” म्हणत दिले स्पष्टीकरण
 

नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासन आणि महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यांच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता स्वतः भुजबळ यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देत कोणताही अबोला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नाशिकमधील अपघातांवर बोलताना भुजबळ यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरले होते. खराब रस्त्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. “ज्या प्रकारे एका प्रकरणात मदत देण्यात आली, त्याचप्रमाणे इतर मृतांच्या कुटुंबीयांनाही समान न्याय मिळायला हवा. जबाबदारी एकमेकांवर ढकलून उपयोग नाही,” असे ते म्हणाले होते.

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया देत नाशिकमधील विकासकामांची माहिती दिली होती. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. डांबरी रस्त्यांऐवजी अधिक टिकाऊ व्हाइट टॉपिंग रस्ते तयार करण्यात येत असून, भूमिगत विविध सुविधा, कॅमेरे आणि आधुनिक नागरी विकासाची कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील सहा महिन्यांत बहुतांश कामे पूर्ण होतील आणि नाशिकचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भुजबळांची प्रतिक्रिया काय ?

दरम्यान, या वक्तव्यांनंतर महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

“हे सगळं मीडियाने तयार केलेलं चित्र आहे. कार्यक्रमात हार अर्पण करण्यासाठी जात असताना गिरीश महाजन यांनीच मला हात देऊन वर घेतले. भाषणादरम्यान एखादा नेता दुसऱ्याचं बोलणं ऐकत असतो किंवा स्वतःच्या भाषणाचा विचार करत असतो. त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही,” असे भुजबळ म्हणाले. त्यामुळे गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात कोणताही अबोला किंवा राजकीय संघर्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, नाशिकच्या विकासकामांबाबत दोघांचे उद्दिष्ट समान असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी

Web Title: Chhagan bhujbal clarifies no rift with girish mahajan over nashik potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • girish mahajan
  • Mahayuti
  • Nashik

संबंधित बातम्या

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
1

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
2

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी
3

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
4

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.