Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal: ‘राजीनामा १५ दिवस आधी झाला असता तर…’, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

Chhagan Bhujbal on Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा १५-२० दिवस आधी झाला असता तर देशात तणाव वाढला नसता, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 26, 2026 | 06:04 PM
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य (Photo Credit- X)

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘राजीनामा १५ दिवस आधी झाला असता तर…’
  • दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य
  • जाणून घ्या काय म्हणाले…
नाशिक: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दिलेल्या राजीनाम्यावर आणि गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबल (Chhagan Bhujbal) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “जर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आधीच घेतला गेला असता, तर देशभरात एवढा तणाव निर्माण झाला नसता. जनतेचा रोष शांत करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे भुजबल यांनी स्पष्ट केले.

‘१५-२० दिवस आधी निर्णय घेतला असता तर हालात वेगळे असते!’

माध्यमांशी बोलताना छगन भुजबल म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा शनिवारी दिला, तोच जर १५ ते २० दिवसांपूर्वी दिला असता, तर देशात जी गंभीर आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली ती उद्भवली नसती. सोनम वांगचुक यांच्यासारख्या पर्यावरणवाद्याला तब्बल २६ दिवस उपोषणाला बसावे लागले. या सर्व घडामोडींमुळे सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला.”

Nashik, Maharashtra: On the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan, Minister Chhagan Bhujbal says, “… If action had been taken earlier regarding this, perhaps a lot of what happened later—like the lathi charge, the outrage there, and all these things… pic.twitter.com/wYFfpyoKKY — IANS (@ians_india) July 26, 2026


ते पुढे म्हणाले, “हा केवळ दिल्लीतील जंतर-मंतरपुरता मर्यादित विषय नाही. हा धडा जंतर-मंतरप्रमाणेच नाशिक, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील सर्वच लोकप्रतिनिधींसाठी आहे. प्रशासनाने आणि सरकारने नेहमी लोकांचे ऐकून घेतले पाहिजे व त्यांच्याशी सतत संवाद ठेवला पाहिजे.”

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

NEET पेपरफुटी अन् सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर राजीनामा

NEET-UG परीक्षांमधील घोटाळे, पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील गैरप्रकारांविरोधात गेल्या अनेक आठवड्यांपासून दिल्लीत विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू होते. आंदोलक विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी करत होते. जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमारानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

प्रल्हाद जोशी देशाचे नवे शिक्षणमंत्री

प्रल्हाद जोशी आता देशाचे नवे शिक्षणमंत्री असणार आहेत. त्यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नवीन शिक्षणमंत्री जाहीर होईपर्यंत प्रल्हाद जोशी अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती मुरमू यांनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे आदेश काढले आहेत. प्रल्हाद जोशी भाजपचे कर्नाटकचे खासदार आहेत. सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांच्याकडे शिक्षण खात्याचा देखील कार्यभार सोपविण्यात आला आहे.

प्रल्हाद जोशी हे भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, वितरण मंत्री तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. प्रल्हाद जोशी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक राहिलेले आहेत.

‘फडणवीस केंद्रात गेले तर धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही जास्त…’; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला

Web Title: Chhagan bhujbals major statement on the student protests in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Dharmendra Pradhan
  • Nashik
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
1

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी
2

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
3

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
4

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.