एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा...; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला
“तुम्हाला एवढी भिती कशाची वाटते, जर तुम्हाला एवढी भिती वाटत अशेल तर आख्खा देश बंद करुन टाका, मला हसू येतयं. दिल्ली ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आंदोलनामुळे त्रास होतो म्हणून तुम्ही मेट्रो बंद करता, रेल्वे बंद करता आता रस्तेही बंद करुन टाकले, आता सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही का?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.
MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण
अभिजीत दिपके म्हणाले की, “तुम्ही किती जणांना अटक करणार, मला अटक करा, सौरव दास, आशुतोष रांका तयार आहेत. आम्हाला अटक करा, तुमच्याकडे परवानगी आहे का, असा सवाल विचारताच, ज्ञानेश कुमारने 13 कोटी मतं डिलिट करताना परवानगी मागितली होती का, फॉर्म 6 मध्ये बदल करण्याची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती का? ज्ञानेश कुमारांनी १३ कोटी मते कोणालाही न विचारता डिलीट केली. त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्याची गरज आहे का, असे कठोर सवालही त्यांनी उपस्थित केले. संविधानाच्या आर्टिकल 19 ने आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली आहे. जंतर-मंतर हे आंदोलनाचं अधिकृत स्थळ आहे” असं अभिजीत दीपकेंनी म्हटलं आहे.
“सरकार घाबरले असल्याने त्यांनी रेल्वे बंद केल्यात, हुकूमशाह घाबरला आहे. सरकार गंभीर आहे म्हणूनच त्यांनी मेट्रो, रेल्वे बंद केली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाहांनी रोज ब्लड प्रेशर चेक केला पाहिजे. त्यांना सीजेपीच्या आंदोलनाची भिती वाटत आहे. ज्ञानेश कुमार इतका महत्वाचा का आहे? राजाचा जीव पोपटात आहे आणि तो पोपट ज्ञानेश कुमार आहे, त्याला पकडलं तर राजालाही जावं लागेल.” असा दावा ज्ञानेश कुमार यांनी केला.
दिल्ली पोलिसांनी DMRC ला राजधानीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद करण्यास आणि काही ठिकाणी गाड्यांची वारंवारता कमी करण्यास सांगितले आहे. ही प्रस्तावित व्यवस्था शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू होऊ शकते आणि १० ऑक्टोबर रोजी परिस्थिती सामान्य होईपर्यंत सुरू राहील. या यादीत राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, पटेल चौक, जनपथ, नवी दिल्ली, मंडी हाऊस, आयटीओ आणि काश्मिरी गेट यांसारख्या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वेने १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही स्थानकांच्या आसपास मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता असल्याचे कारण रेल्वेने दिले आहे.






