Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Tiranga Lehra Do Movement:आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम; दिल्ली पुन्हा तापणार

CJP Lehra Do Tiranga: कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि सहकारी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली. अटकेनंतर तिघांनाही मंदिर मार्ग पोलिस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 15, 2026 | 10:40 AM
CJP Lehra Do Tiranga, Abhijit Dipke Connaught Place Protest, Sourav Das Ashutosh Ranka Arrest,

CJP Lehra Do Tiranga, Abhijit Dipke Connaught Place Protest, Sourav Das Ashutosh Ranka Arrest,

Follow Us
Follow Us:
  • सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका व सौरव दास यांच्या ५ दिवसांच्या कोठडीच्या निषेधार्थ ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम
  • सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांच्याकडून १६ ऑक्टोबर रोजी ५ वाजता आंदोलनाची हाक
  • दिल्लीतील मध्यवर्ती कॅनॉट प्लेस (CP) येथील सेंट्रल पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन
  • “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही हे सरकारला दाखवून देऊ” — दीपके यांचा व्हिडीओ संदेश
 

CJP Tiranga Lehra Do Movement: १६ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंच ‘लेहरा दो तिरंगा’चं आवाहन
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्या प्रकरणी आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतही पाठण्यात आले आहे. या अटकेच्या विरोधाप्रकरणी उद्या १६ ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी देशाला “लेहरा दो तिरंगा ” या मोहिमेसाठी साद घातली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि सहकारी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली. अटकेनंतर तिघांनाही मंदिर मार्ग पोलिस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आशुतोष, सौरव आणि अजिंक्य यांच्या अटकेवरून संताप व्यक्त केला आहे.

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक

अभिजीत दिपके यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत ‘लेहरा दो तिरंगा’ मोहिमेसाठी दिल्लीसह देशभरातील तरुणांना आवाहन केलं आहे. “हॅलो मित्रांनो, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना फक्त तिरंगा फडकवाल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले. पण आता जे लोक देशभक्त आहेत,जे लोक तिरंग्यावर प्रेम करतात, त्यांना माझी विनंती आहे की, येत्या १६ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता सेंट्रल पार्क, कॅनॉट प्लेस याठिकाणी आपापले तिरंगे घेऊन या, तिथे आपण सर्वजण एकत्र मिळून तिरंगा फडकवूया आणि तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही, हे आपण यांना (केंद्र सरकारला) दाखवून देऊयात.

Lehra do Tiranga 🇮🇳 16 Oct | Central Park, CP | 5 PM https://t.co/eFO1RfUBos — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 14, 2026

पण जे लोक दिल्लीत येऊ शकत नाही, त्यांनी आपापल्या शहरांमध्ये तिरंगा मार्च काढा, या लोकांना दाखवून द्या की आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि तो फडकावणे हा गुन्हा नाहीये. हे या हुकुमशाहांना दाखवून देऊय. कदाचित यानंतर मलाही तुरुंगात टाकले जाऊ शकते, पण मला त्याची पर्वा नाही, तिरंगा हा माझा अभिमान आहे आणि तो मी फडकावणारच.” असा खुला इशाराही अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

 

केंद्र सरकारविरुद्ध देशभरात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता

दुसरीकडे, आशुतोष आणि सौरव यांच्या अटकेवरून लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधींसह ‘इंडिया’ आघाडीनेही निषेध व्यक्त केला. इंडिया आघाडीनेही या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता सीजेपीच्या या ‘लहरा दो तिरंगा’ मोहिमेमुळे दिल्लीतील राजकीय व सामाजिक वातावरण कमालीचे तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे

जंतरमंतरवर जमावबंदी आणि आंदोलनांसाठी बंदी घातल्यानंतरही सौरव आणि आशुतोष यांनी तिरंगा फडकावून घोषणाबाजी केली. त्यामुळे आता सीजेपीने थेट मध्य दिल्लीतील अत्यंत वर्दळीच्या कॅनॉट प्लेस (CP) येथे तिरंगा आंदोलनाची हाक दिल्यामुळे दिल्ली पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचेही धाबे दणाणले आहेत.

सोशल मीडियावर #LehraDoTricolour आणि #CJPProtest हे हॅशटॅग वेगाने ट्रेंड

खास बाब म्हणाजे, सोशल मीडियावर #LehraDoTricolour आणि #CJPProtest हे हॅशटॅग वेगाने ट्रेंड होताना दिसत आहेत. देशातील विविध विद्यार्थी संघटना व युवा वर्ग १६ ऑक्टोबरच्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

“केवळ राष्ट्रध्वज हातात घेतल्यामुळे आमच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले गेले. आता संपूर्ण देश हातात तिरंगा घेऊन कॅनॉट प्लेसवर उत्तर देईल.” असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'लहरा दो तिरंगा' (Lehra Do Tiranga) मोहीम कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: ही मोहीम शुक्रवारी, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कॅनॉट प्लेस (Connaught Place) येथील 'सेंट्रल पार्क' येथे आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: कॉकरोच जनता पार्टीने (CJP) या आंदोलनाची घोषणा का केली आहे?

    Ans: आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि राष्ट्रध्वज फडकवणे हा गुन्हा नाही हे दाखवण्यासाठी सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी या मोहिमेची हाक दिली आहे

  • Que: या आंदोलनाला कोणत्या प्रमुख राजकीय नेत्यांचा व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे?

    Ans: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीतील प्रमुख पक्षांनी सीजेपी नेत्यांच्या अटकेचा निषेध करत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Cjp chief abhijit dipke announces lehra do tiranga movement at connaught place on october 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • abhijeet dipke

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
1

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक
2

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
3

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा
4

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.