Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

ज्याप्रकारे बिलकीस बानो यांच्या बलात्काऱ्यांचे स्वागत केले होते. जर देशाचे शिक्षणमंत्रीच बलात्काऱ्याचे स्वागत करत असेल, त्याचे कौतुक करत असेल, धर्मेद्र प्रधान यांना काढून आणखी एक विचीत्र माणूस बसवून ठेवलाय असे दिसते. 

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 12:51 PM
CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात
Follow Us
Follow Us:

Abhijeet Dipke Replied Ramdev Baba:  “संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो घेऊ जय भीमचे नारे देणे, महात्मा  गांधींचे फोटो घेऊन आंदोलन करणे हे  संस्कृती बदनाम करण्यासारखे आहे, तर हो आम्ही संस्कृती बदनाम करत आहोत.  तुम्ही जे पतंजलीचे जे  उत्पादने बनवत आहात, त्याकडे लक्ष केंद्रीत करा”. अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी रामदेव बाबांना प्रत्युत्तर दिले आहे.

संस्कृती, लोकशाही आणि देश  जेन-झी बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतात, असे मला वाटते.  रामदेव बाबांनी पतंजली जे फॉल्टी प्रॉडक्ट्स आहेत त्याकडे लक्ष द्या नाहीतर ते बंद पडून जातील. असा टोला अभिजीत दिपके यांनी रामदेव बाबांना लगावला आहे.

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

आज सकाळी माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत सीजेपीकडून   शेतकरी संघटनांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना अभिजीत म्हणाले की, शेतकऱ्यांची मुलांचेही शिक्षण सुरू आहे. त्यांचीही मुले स्पर्धा परीक्षा देत आहेत. शेतकरी संघटना, युनियन यांच्याकडून आम्हाला खूप मोलाचा पाठिंबा मिळाला आहे.  जेव्हा आम्हाला गरज होती त्यावेळी ते आमच्या सोबत होते. इथून पुढे  जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना आमची गरज असेल त्यावेळी आम्हीदेखील त्यांच्यासोबत उभे राहू.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत गृहमंत्री  अमित शाहांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे विधान केले. असे पत्रकारांनी विचारले असता अभिजीत म्हणाले की,  हो त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमच्या आंदोलनावेळी सीजेपीला बाहेरुन, परदेशातून फंडिंग मिळत असल्याचे आरोप केले गेले, मग अमित शाहा गृहमंत्री असतानाही हे सर्व कसं शक्य झालं,सीजेपी बाहेरून चालत आहे, सीजेपीला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर, हे अमित शाहांचेच अपयश आहे, मग हे कसले चाणक्य,  असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Rahul Gandhi PC: माईक बंद कराल, पण विद्यार्थ्यांचा आवाज नाही!; संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधींचा आरोप

२० जुलैला  ज्या प्रकार दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमधून विद्यार्थ्याना माराहाण करण्यात आली, त्यांचं रक्त सांडलं हे  अमित शाहांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. असंही त्यांनी नमुद केलं. प्रियांका गांधी यांनी नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींबाबत विचारण्यात आले.  त्यावर, मी त्यांची एक क्लिप पाहिली. ज्याप्रकारे बिलकीस बानो यांच्य बलात्काऱ्यांचे स्वागत केले होते. जर देशाचे शिक्षणमंत्रीच बलात्काऱ्याचे स्वागत करत असेल, त्याचे कौतुक करत असेल, धर्मेद्र प्रधान यांना काढून आणखी एक विचीत्र माणूस बसवून ठेवलाय असे दिसते.  बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला  शिक्षण मंत्रीपद देऊन तुम्ही देशाला काय संदेश देत आहात, असा सवालही अभिजीत यांनी उपस्थित केला.

पण हे लोक दुसरं करणार तरी काय, कुलदिप सेंगर कोण होता, यांच्या सत्तेत राम रहिम पेरोलवर बाहेर येऊ शकतात, तर गुंड आणि बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे हे सरकार आहे. अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.  झेनझी ना ट्रोल करून तुम्हाला काय मिळणार आहे, आज जी मुले १५  ते २८ च्या वयोगटातील आहेत. तीच मुले उद्या जाऊन मतदार बनणार आहे, हीच मुले उद्या देश चालवणार आहे, मग तुम्ही त्यांना ट्रोल का करताय, असा सवालही अभिजीत यांनी उपस्थित केला.

 

 

 

Web Title: Cjp chief abhijit dipke demands home minister amit shah resignation foreign funding allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग
1

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!
3

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.