Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश

टोकाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आम्ही आज एकत्र आलो आहोत. हे अनेकांना आश्चर्यकारक वाटेल. पण हा निर्णय वैयक्तिक राजकारणासाठी नाही, तर बावधन व शेंदुरजणे भागाच्या स्वाभिमानासाठी घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2026 | 03:00 PM
काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत; भाजपला मोठा धक्का

काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत; भाजपला मोठा धक्का

Follow Us
Close
Follow Us:

वाई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात वाई तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या एका घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जयकुमार गोरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे युवा नेते विराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या रुतुजा शिंदे यांच्यासह बावधन व शेंदुरजणे गणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

किसन वीर कारखाना कार्यस्थळावर हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. व्यासपीठावर प्रमोद शिंदे, मोहन जाधव, प्रताप पवार, मदन भोसले, किरण काळोखे, अरविंद कुदळे, शंकरआप्पा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रवेशावेळी बोलताना विराज शिंदे म्हणाले, ‘टोकाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आम्ही आज एकत्र आलो आहोत. हे अनेकांना आश्चर्यकारक वाटेल. पण हा निर्णय वैयक्तिक राजकारणासाठी नाही, तर बावधन व शेंदुरजणे भागाच्या स्वाभिमानासाठी घेतला आहे. येथील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी दोन पावले मागे घेत एकोप्याचा मार्ग स्वीकारला. मतभेद विसरून या भागाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे’.

हेदेखील वाचा : Solapur Election 2026: पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट, सोबत राहण्याचा धर्मराज काडादी यांनी दिला शब्द

यावेळी मेघराज शिंदे, सोसायटी चेअरमन प्रकाश मारुती शिंदे, माजी सरपंच रामदास खामकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन दिलीप पिसाळ यांनी केले, तर मदन भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बावधन जिल्हा परिषद गट, शेंदुरजणे गण व बावधन गणातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयकुमार गोरे यांनी घेतली काडादी यांची भेट

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. महानगरपालिका निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिला.

हेदेखील वाचा : Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित

Web Title: Close associate of jaykumar gore has joined the ncp party strength has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड
1

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड

Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?
2

Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?

Maharashtra ZP Election : झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra ZP Election : झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.