Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित
मशिदीबाहेर राडा, इंटरनेट बंद अन् 110 जणांना थेट…; ‘या’ राज्यात नक्की घडले तरी काय?
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील विविध शासकीय व शैक्षणिक इमारतींमधील खोल्या व खुल्या जागांना यासाठी मान्यता दिली आहे. या ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे (स्ट्रॉग रूम) तसेच मतमोजणीसाठी केला जाणार आहे. निवडणूक प्रशासनाने प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १
भैरप्पा राजू माळी यांच्याकडे प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रभागांची मतमोजणी वेलणकर हॉल, दयानंद कॉलेज, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम वेलणकर हॉल येथील रूम नं. १ (पहिला मजला) आणि दयानंद कॉलेजमधील रूम नं. २ मध्ये असेल.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २
विजया पांगरकर यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५, ६, ७ व १५ देण्यात आले आहेत. मतमोजणी सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, सिंहगड कॉलेज, केगाव येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम मॅनेजमेट बिल्डिंग, तळमजला, सिंहगड कॉलेज येथे राहील.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३
सचिन इथापे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ८. ९ व १४ ची जबाबदारी असून मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे होईल, ईव्हीएम स्ट्रॉग रूम रूम नं. ४ व ५. शासकीय तंत्रनिकेतन येथे असेल.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४
अंजली मरोड यांच्याकडे प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १३ देण्यात आले आहेत. मतमोजणी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम मातोश्री आशाताई अंबादास सरगम शाळा, रूम नं. ३. नर्सरी स्ट्रॉबेरी, कुचन प्रशाला येथे राहील.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५
अभिषेक देशमुख यांच्याकडे प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २१ असून मतमोजणी विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, जुळे, सोलापूर येथे होणार आहे. ईव्हीएम स्ट्रॉग रूम याच प्रशालेच्या तळमजल्यावर असेल.
बॉसने दिली लालसा, भावाने सोडली २६ लाखांची नोकरी… शेवटी हातात आला पश्चाताप!
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ६
सदाशिव पडदुणे यांच्याकडे प्रभाग क्रमांक १९, २० व २५ देण्यात आले आहेत. मतमोजणी नूतन मराठी विद्यालय, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम नर्सरी फुलपाखरू कलादालन, नूतन मराठी विद्यालय येथे असेल.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ७
जयश्री आव्हाड यांच्याकडे प्रभाग क्रमांक २२, २३, २४ व २६ ची जबाबदारी आहे, या प्रभागांची मतमोजणी शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम देखील याच ठिकाणी असणार आहे.






