Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी SIRच्या कामावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला. SIRसाठी अधिक वेळ देण्याची गरज होती, असा दावा करत त्यांनी मतदार याद्यांमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

  • By विवेक
Updated On: Aug 24, 2026 | 07:15 PM
SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • SIRचे काम घाईगडबडीत सुरू असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
  • ‘भाजपा मतचोरी करत होता, आता मतदार याद्याही चोरत आहे,’ अशी टीका
  • महिला आरक्षण विधेयकावर भाजपाकडून दिशाभूल होत असल्याचा दावा
महाराष्ट्रातील SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाच्या कामावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. SIRचे काम अत्यंत घाईगडबडीत सुरू असून, यासाठी अधिक वेळ देण्याची गरज होती, असा दावा सपकाळ यांनी केला. तसेच भाजपाकडून आता मतदार याद्यांमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

नाशिक येथे काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी सपकाळ माध्यमांशी बोलत होते. या शिबिरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

SIRच्या मुदतीवरून सवाल

SIRच्या कामासाठी 17 ऑगस्टची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. मात्र, ही मुदत आणखी दोन ते तीन महिने वाढवली असती, तर मतदार यादीचे काम अधिक सुरळीतपणे पूर्ण करता आले असते, असे सपकाळ यांनी सांगितले. ‘भाजपा मतचोरी करत होते, आता तर मतदार याद्याही चोरत आहेत,’ असा आरोप करत हा प्रकार लोकशाहीला हुकूमशाहीच्या दिशेने घेऊन जाणारा असल्याची टीका त्यांनी केली.

Sanjay Raut Slams Narendra Modi: चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

नागपूरमधील हैदराबाद हाऊस येथे बीएलओंना बोलावून मॅपिंगशी संबंधित कागदपत्रे आणण्यास सांगितल्याचा दावाही सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महिला आरक्षणावरही भाजपावर निशाणा

पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा उल्लेख करत सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. महिला आरक्षण विधेयकाबाबत भाजपाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले असून, आता त्याच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असे सपकाळ म्हणाले. भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर केले जाणारे आरोप तथ्यहीन असल्याची टीकाही त्यांनी केली.

Rohit Pawar on Nagpur Event: ’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी सुरू झालेले हे प्रशिक्षण शिबिर दहा दिवस चालणार असून, पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Harshwardhan sapkals allegation sir voter list bjp maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • SIR
  • Voter List

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं
2

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
3

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
4

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.