Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2026 | 05:45 PM
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Follow Us
Follow Us:

नाशिक : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे. राज्यातील भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली पण त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

नाशिक येथे उपोषणास बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आदिवासी विभागात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा मलिदा खावून विद्यार्थ्यांना मात्र कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. १०-१२ दिवसापासून विद्यार्थी उपोषाणास बसले आहेत पण भाजपा महायुती सरकारच्या एकाही मंत्र्याला त्यांची दखल घ्यावी असे वाटले नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रश्नात जातीने लक्ष देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या मंजूर केल्या पाहिजेत. हे सरकार आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना काही झाले तर त्याची सर्व जबाबदारी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे राहुल गांधी यांना आदिवासींच्या प्रश्नांची अद्ययावत माहिती नाही असे सांगत आहेत, पण तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहेत त्याची माहिती तर तुम्हाला आहे का? १३ दिवस तुम्ही झोपा काढल्या का? प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा आहे, वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली मुलींची प्रेगनन्सी टेस्ट केली जाते याचा आहे, पण मंत्री महोदय मात्र त्यावर उत्तर न देता दुसऱ्याच प्रश्नावर बोलत आहेत. हेच मंत्री महाशय, मी काही करू शकत नाही, स्वारी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा असे विद्यार्थ्यांना सांगतात व मुख्यमंत्र्यांना या उपोषणाची दखल घेण्यास वेळ नाही, अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Web Title: Harshvardhan sapkal has demanded that the demands of tribal students be accepted immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा
1

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले
3

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
4

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.