Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “हे नरहरी झिळवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र; कॉंग्रेस महिला नेत्याचा गौप्यस्फोट

मंत्रिमंडळामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपीकावर एसीबीने कारवाई करत त्याला रंगेहात पकडले आहे. हे भाजपचेच षडयंत्र असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे,

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2026 | 06:39 PM
मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवांवर मोठी कारवाई; थेट कार्यमुक्तीच दिली

मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवांवर मोठी कारवाई; थेट कार्यमुक्तीच दिली

Follow Us
Follow Us:
  • नरहरी झिरवाळ यांच्या दालनामध्ये ACB ची कारवाई
  • झिरवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र
  • काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट
Narhari Zirwal News : मुंबई : राज्याच्या कारभार चालवणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. हा लिपीक राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या दालनातील आहे.  या कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले. दरम्यान हे नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने केलेल्या मोहिमेवर देखील प्रतिक्रिया दिली. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील काही पैसे स्वीकारताना या लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावर त्या म्हणाल्या की, ‘हे टक्केवारीचे सरकार आहे तर नरहरी झिळवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपच षडयंत्र असू शकतं.’ अशी टीका ठाकूर यांनी केली.

हे देखील वाचा : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आता मंत्रालयामध्ये देखील याच गोष्टी चालू आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झालं आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते. हे टक्केवारीचे सरकार हे आहे, अशी घणाघाती टीका यावेळी ठाकूर यांनी सरकारवर केली आहे.

हे देखील वाचा : “तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

यशोमती ठाकूर म्हणाल्या की,  ‘भाजपाने देशाला विकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात पण साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही. महिलांच्या आड लपण्याचा प्रयत्न मोदी करतात या देशाचं राजकीय वगळ वेगळ्या स्वरूपामध्ये जात आहे या गोष्टीचा निषेध आहे. एपस्टीन फाईलमध्ये भाजपचे मंत्री हरदीप पुरी यांचं नाव आढळले आहे. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.

नहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

या प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.

 

Web Title: Congress leader yashomati thakur alleges that acbs action in narhari jirwals office is a bjp conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Narhari Zirval
  • political news
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.