Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण कर्जमाफी करा ! शक्तिपीठ महामार्ग रद्द करा ! धाराशिवमध्ये कॉंग्रेसचे आंदोलन, कर्जमाफीच्या जीआरची केली होळी

सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस कडून कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Jun 12, 2026 | 07:07 PM
Congress protest in Dharashiv, Congress protest, loan waiver to farmers, Congress, शेतकरी कर्जमाफी,

Congress protest in Dharashiv, Congress protest, loan waiver to farmers, Congress, शेतकरी कर्जमाफी,

Follow Us
Follow Us:

राज्यभरात विरोधी पक्षांकडून राज्य सरकारविरोधात मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी शेतकरी प्रश्नावरून सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आधीच संकटात असताना राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आणि फसवी असल्याचे सांगत हे आंदोलन करण्यात आले. सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा या मागणीसाठी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

तसेच प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा रद्द करण्यात यावा. या महामार्गामुळे धाराशीव जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक शेती आणि फळबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येणार असल्याने, स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने थांबवावा अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये संपूर्ण कर्जमाफी आणि महामार्ग रद्द करण्यासोबतच, शेतीमालाला हमीभावासह खरेदीची हमी द्यावी आणि शेतकरी, कामगार, युवक व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस नेत्यांसह काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका

हर्षवर्धन सकपाळ यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. खरिप हंगामासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “राज्यात बि बियाणांची टंचाई आहे, खतांची लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही. पूर्वी राजे महाराजे राज्यात परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी वेशांतर करून जात व वस्तुस्थिती जाणून घेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेशांतर करून जातात पण दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी असा टोला सपकाळ यांनी लगावत फडणवीसांचे सरकार हे ‘आंधळे, बहिरे व मुके’ आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

पवारांच्या तंबूत भगदाड! धैर्यशील मोहिते-पाटलांचा ‘अदृश्य हात’ ठरला निष्प्रभ; तीन आमदार महायुतीच्या दारात

Web Title: Congress protest in dharashiv over demand of complete loan waiver to farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Congress
  • Farmer Loan Waiver
  • Farmer Protest

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट
1

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
2

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
3

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
4

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.