Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसच्या दिग्गजांसह तरुण उमेदवारही मैदानात

राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल आता वाजू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आता काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 06:13 PM
Congress releases candidates list for Vidhan Parishad Election 2026,

Congress releases candidates list for Vidhan Parishad Election 2026,

Follow Us
Follow Us:
  • राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल
  • काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी केली जाहीर
  • काँग्रेसने आपल्या आठ जागांवरील सहा उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल आता वाजू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आता काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार उतरवले गेले असून अजूनही काही जागांवर उमेदवार निवडीवरून संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. काँग्रेस या विधानपरिषद निवडणुकीत एकूण आठ जागांवर लढणार असून आतापर्यंत सहा जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत अद्याप दोन जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आलेले नाहीत.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेही आपल्या आठ जागांवरील सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर दोन जागांवरील उमेदवारांची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

काँग्रेसच्या सहा उमेदवारांची नावे जाहीर

चंद्रपूर – वर्धा – शैलेश देशमुख
अमरावती – हर्षदीप देशमुख
यवतमाळ – साहेबराव कांबळे
लातूर – महेश देशमुख
सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर
नागपूर – साहेबराव कांबळे
लातूर – महेश देशमुख
सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर
नागपूर – अतुल लोंढे

काँग्रेसकडून सहा जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले असले तरीही अद्याप भंडारा – गोंदिया विधानपरिषद मतदारसंघाच्या जागेवर अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही.

असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.

Maharashtra politics : अहिल्यानगर विधान परिषदेत महाविकास आघाडीला धक्का! राणी लंके यांचा अर्जच नाही, काँग्रेसचे करण ससाणे रिंगणात

महायुतीकडूनही उमेदवार जाहीर

भाजप
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – अरुण लखानी
भंडारा – गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – प्रवीण पोटे
सोलापूर – राजेंद्र राऊत
सांगली- सातारा – धैर्यशील कदम
अहिल्यानंगर – प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर – जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव – बीड – लातूर – बसवराज पाटील
जळगाव – नंदकिशोर महाजन
नागपूर – राजीव पोतदार

शिवसेना
ठाणे – रवींद्र फाटक
नाशिक – नरेंद्र दराडे
परभणी – हिंगोली – सईद खान
यवतमाळ – दुष्यन्त चतुर्वेदी

राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे
पुणे – विक्रम काकडे

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात

Web Title: Congress releases candidates list for vidhan parishad election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Congress
  • Mahavikas Aghadi
  • vidhanparishad election 2024

संबंधित बातम्या

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
1

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
3

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
4

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.