Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने घेतलेल्या माघारीवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी ही घटना महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असल्याचे सांगत भाजपवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 12:29 PM
महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया

महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • उद्धव सेनेच्या उमेदवाराच्या माघारीवर काँग्रेस संतप्त
  • महाविकास आघाडीला धक्का?
  • उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया
चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने घेतलेली माघार ही महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असून मित्र पक्ष व मतदारांच्या विश्वासाला तडा देणारी घटना आहे. महायुतीकडे आधीच पुरेसे संख्याबळ आणि मतदारांचे समर्थन असताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडणे. हा भाजपचा हतबलतेतून केलेला राजकीय डाव असल्याचे दिसून येते. ही जागा काँग्रेस पक्षाकडे असती, तर विजय-पराजयाची चिंता न करता काँग्रेसने ही निवडणूक ताकदीने लढवली असती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोड्या; नितीन नबीन यांनी मंजूर केला अण्णामलाई यांचा राजीनामा

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारामागे उभा राहिला असता. ज्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत संधी दिली, विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली, त्याच पक्षाला अडचणीत आणणारे नेते कोणत्याही पक्षात दीर्घकाळ समाधानाने राहू शकत नाहीत, असे मत सोनललक्ष्मी घाग यांनी व्यक्त केले आहे.

भविष्यात अशा अविश्वसनीय उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या नावाखाली प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा गंभीरपणे विचार करणे अधिक योग्य ठरेल. देशात सध्या भाजपविरोधी राजकारणाला बळ मिळत असून महायुतीतही अंतर्गत मतभेद आणि धुसफूस स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असल्याची चर्चा आहे. तसेच घराणेशाहीविरोधातील वाढता जनक्षोभ लक्षात घेता भाजपने बदलाचे वारे ओळखले आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला राजकीय दबाव किंवा घोडेबाजाराच्या माध्यमातून माघार घ्यायला लावणे म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखे आहे, असेही सोनललक्ष्मी घाग यांनी स्पष्ट केले आहे.

विश्वासघातावर संताप: ऐनवेळी उमेदवाराने माघार घेतल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि पक्षाच्या विचारांचा मोठा अपमान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पक्षाशी बांधिलकी: वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा दबावाखाली येऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने आणि कार्यकर्त्यांनी धडा शिकवला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

भविष्याची दिशा: अशा माघारीमुळे पक्षाचे खच्चीकरण होणार नसून, आगामी काळात अधिक ताकदीने आणि एकजुटीने लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics: नाशिक निवडणुकीत तिरंगी ट्विस्ट! दराडे-गीते-हिरे आमनेसामने, बिनविरोधचा प्लॅन फेल

Web Title: Congress slams bjp over uddhav shiv sena candidate withdrawal mlc election news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Congress
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
1

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
2

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
3

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.